Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

सातपुड्या भागातील जुनी सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न...



मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा जुनी सांगवी येथे मतदार जनजागृती रॅली

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जुनी सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिरपूर तालुक्यातील  जुनी सांगवी येथील सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील जुनी सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्फत नेहमीच विविध जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात येत असून आगामी काळात लोकसभा निवडणुकांमध्ये दुर्गम भागातील मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमार्फत निबंध स्पर्धा, पथनाट्य, प्रभातफेरी, तसेच शिक्षकांसाठी स्पर्धा, पालकांना आवाहन पत्र अश्या विविध स्पर्धा घेऊन जनजागृती करण्यात आली. सर्व मतदार जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा प्राथमिक जुनी सांगवी  येथील मुख्याध्यापक संजय पोतदार, शिक्षक संगीता बागल, महेंद्र पावरा, उमेश चव्हाण, नरेंद्र कोळी, मुकेश कोष्टी, राकेश खर्डे, राजेंद्र देशमुख, अविनाश साबळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यासाठी तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध