Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १७ एप्रिल, २०२४
Home
/
Unlabelled
/
माहिती देण्यास टाळाटाळ करणारा ग्रामसेवक श्री संजय वाघ यांच्यावर राज्य माहिती आयोगाकडून तीन हजार रु मात्रची दंधात्मक कार्यवाही....
माहिती देण्यास टाळाटाळ करणारा ग्रामसेवक श्री संजय वाघ यांच्यावर राज्य माहिती आयोगाकडून तीन हजार रु मात्रची दंधात्मक कार्यवाही....
सविस्तर :- धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत नवलनगर येथील तत्कालीन ग्रामसेवक श्री.संजय वाघ यांच्याकडे धुळे जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते धनराज व्ही. निकम यांनी दि 11/12/2018 रोजीच्या अर्जान्वये संबंधित ग्रामपंचायत कडून 14 वा वित्त आयोग बाबत सविस्तर माहितीची मागणी केली होती.सदर माहिती 30 दिवसात न मिळाल्याने प्रथम अपील दाखल केले होते.प्रथम अपिलीय आदेशानुसार देखील माहिती न पुरविल्याने अपिलार्थी यांनी थेट राज्य माहिती आयोग नाशिक दुसरे अपील दाखल केले होते. त्याअनुषंगाने आयोगाने दि 27/11/2020 रोजी सुनावणी घेऊन आदेश करून संबधिताला माहिती अधिकार अधिनियम ,2005 चे कलम 20(1) अन्वये शास्तीची कार्यवाही का करू नये म्हणून लेखी खुलासा मागितला होता. आयोगाच्या आदेशानुसार देखील सदर तत्कालीन ग्रामसेवक श्री संजय वाघ यांनी कुठलाही खुलासा सादर केला नाही.
आयोगाने सर्व कागदपत्रे पाहणी करून विहित मुदतीत तसेच प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या आदेशानंतर हि माहिती पुरविली नाही.जवळजवळ आजतागायत कोणतीही माहिती पुरविली नाही. म्हणून संपूर्ण परिस्थितीचा विचार करून आयोगाने श्री संजय वाघ तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत नवलनगर ता जि धुळे यांच्या विरुद्ध माहितीचा अधिकार अधिनियम , 2005 चे कलम 20(1)अन्वये रु 3000/- ( रु तीन हजार रु मात्र ) शास्तीची ( दंधात्मक ) कार्यवाही केलेली आहे.तसेक सदर रक्कम पंचायत समिती , धुळे येथील गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत, नवलनगर येथील तत्कालीन ग्रामसेवक श्री संजय वाघ यांच्या वेतनातून कपात करून माहितीचा अधिकारातील लेखाशीर्षाखाली भरणा करण्याची कार्यवाही करावी असे आदेश राज्य माहिती आयुक्त,खंडपीठ नाशिक यांनी केलेले आहेत.
सदर राज्य माहिती आयोगाकडून शास्ती रक्कम अत्यंत कमी आहे. नियमानुसार प्रति दिवस रु 250/- प्रमाणे रु 25 हजारांची करायला हवी होती. तशी कार्यवाही झालेली नाही. तसेच शास्तीची रक्कम विनाविलंब वसूल करून त्यांची नोंद नियमानुसार सेवा पुस्तिकेत करण्यात यावी.तसेच माहिती अधिकार कायद्यांचे उल्लंघन करणारे कामचुकार जन माहिती अधिकाऱ्यांना शिस्तभंगाची कार्यवाही करावी.वेतनवाढ रोखून कायद्याचे महत्व पटवून द्यावे असे मत माहिती अधिकार कार्यकर्ता धनराज व्ही निकम यांनी व्यक्त केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील शेवडीपाडा येथे जल जिवन मिशन योजनेत मौजे शेवडीपाडा येथे नळ पाणी पुरवठा जलजीवन योजनेतील संबंधित यंत्रणेचे अधिकारी संगनमताने...
-
राज्यात सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्...
-
1) कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू (महसूल विभाग) 2) ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्स...
-
मुंबई, दि. २७: - राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव...
-
दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी 1972 मध्ये मुकटी धुळे गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.काँग्रेस पक्षात युव...
-
अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर येथील शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मंत्री अनिल पाटील यांना झालेल्या बैठकीत पाठींबा जाहीर केला आहे. समस...
-
पुणे, दि.२९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रो टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच...
-
धुळे (प्रतिनिधी) येथील स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासन विभागाने गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी संयुक्तरित्या शहरातील मिरची मसाल्या...
-
नाशिक, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत.त्यांनी शेतकरी,कामगार,महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्...
-
कोल्हापूर, दि.२८ : आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत.त्यांचे अनुभव,ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे.त...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा