Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ एप्रिल, २०२४

जेबापूर परिसराच्या राजकीय पटलावरील मुसदी राजकारणी, ढाण्या वाघ अखेर काळाच्या पडद्याआड...



कै.मधुकर आनंदा भदाणे रा.जेबापूर ता.साक्री जि.धुळे यांची प्राणज्योत काल दि.13/ 4 /2024 शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गुजरात सुरत येथील सुपर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना वयाच्या 59 व्या वर्षी त्यांचे दुखद निधन झाले.मधु आप्पा म्हणजे जेबापूर नगरीतलं राजकीय पटलावरचं एक वादळी व्यक्तिमत्व अजातशत्रू आपल्या सुरुवातीच्या काळात उच्च शिक्षण घेऊन उत्तम ठेकेदार म्हणून त्यांनी पिंपळनेर परिसरात आपले नावलौकिक केले होते आप्पांच्या जीवनातील बहुतांशी कार्यकाळ हा सक्रिय राजकारणी म्हणून घालवला त्यातच जबापूर येथील मोठ्या घराण्यात आप्पांचा वारसा होता पाच भावंडांपैकी मधू आप्पा हे एक होते जेबापुर मध्ये या पाचही भावंडांची ही अनोखी जोड हेच आप्पांचे खरे भांडवल होते अगदी महाभारतातल्या पांडवांप्रमाणे या पाचही भावांकडे पाहिलं जायचं काही लोक अगदी त्यांच्या एकतेचे उदाहरण अनेक वेळा बोलून दाखवत होते उत्कृष्ट शेतकरी कार्यक्षम ठेकेदार मुच्छ दि राजकारणी जेबापूर चा ढाण्या वाघ अशी देखील त्यांची ओळख होती पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्या देखील मधू आप्पांचा चांगलाच दरारा होता आप्पां स्वभावाने खूप कडक,शिस्तप्रिय जे होटात तेच पोटात हा आप्पांचा मूळ स्वभाव विशेष म्हणजे जेबापुर च्या आदिवासी बांधवांवर मधू आप्पांचा नेहमीच विशेष प्रेम राहिले आहे त्यांनीही आप्पांवर भरभरून असे प्रेम केले त्यामुळे मधु आप्पा हे अनेक वेळा जेबा पूर ग्रामपंचायतिचे सरपंच,उपसरपंच, सदस्य,अशी अनेक पदे त्यांनी निर्विवादपणे भूषवली आहेत आत्ता देखील ते जेबापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच होते.वरिष्ठ पातळीवर नंदुरबारच्या विद्यमान खासदार डॉ हिना गावित व आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे ते खंदे समर्थक होते त्यांनी जेवापूर गावासाठी आपल्या स्वतःच्या ताकदीवर खासदारांकडून आपल्या गावासाठी विशेष निधी मिळून घेण्यास काम केलं आहे आप्पांच्या कामाची अनेक उदाहरणे देता येतील आप्पांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या जनसमुदायावरून त्यांच्या कर्तुत्वा ची प्रचिती आपल्याला येते तूतार्थ एवढेच....कैं.मधु आप्पांच्या जाण्याने जेबापूर येथील भदाणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या परिवारास देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध