Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

राजकारणातील भक्ती तुम्हास हुकूमशाहीकडे नेते -किरण माने यांचे शिरपूरात प्रतिपादन



शिरपूर प्रतिनिधी- बुद्धिस्ट प्रबोधन मंच शिरपूर यांनी भारतातील समग्र सामाजिक क्रांतीचे आद्य जनक अध्यपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव निमित्ताने वैचारिक प्रबोधन कार्यक्रम दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी शिरपूर शहरात आयोजित केला होता. 
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते कलावंत व विचारवंत मा. किरण माने (सातारा) यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजन केला होता. यात त्यांनी समता प्रवाही विचारधारा या विषयावर प्रबोधन केले.
आपल्या विचार प्रबोधनात किरण माने यांनी यापूर्वी समाजासाठी ज्या ज्या महामानवांनी अनमोल असे योगदान देऊन ऐतिहासिक क्रांती घडवत सामाजिक न्याय तुम्हा आम्हा सर्वांना मिळवून दिला त्या सर्व महामानवांचे स्मरण करून इतिहासाला हात घालत वर्तमान परिस्थिती यांच्याशी सांगड साधत वास्तवतेची जान करून दिली. आपल्या प्रबोधनात त्यांनी क्रांती आणि उत्क्रांती याविषयी ऐतिहासिक संदर्भ देऊन प्रबोधन केले. त्यांनी आपल्या प्रबोधनात नमूद केले की संविधान सभेच्या एक दिवस आधी संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेला उद्देशून शेवटचे भाषण केलं.
 त्यात त्यांनी भविष्यकाळात होणाऱ्या राजकीय परिणामांची मीमांचा आजपासून शेकडो वर्ष पहिले मांडून ठेवले होते. पुढे येऊ पाहणाऱ्या प्रत्येक क्रांतीच्या धोक्याची कल्पना त्यांनी स्पष्ट शब्दात त्यावेळेस नमूद केली होती. त्यावेळेस त्यांनी असे नमूद केले होते की इतिहासाची पुनरावृत्ती होईल की काय या विचारांनी मी चिंताग्रस्त झालो आहे. जात आणि संप्रदाय या संदर्भातले आपले जे शत्रू आहेत त्या पक्षांच्या विचारधारेची निर्मिती या लोकशाहीत होणार आहे. आणि अशा पक्षांनी आपल्या विचारधारेला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वतंत्र पुन्हा एकदा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल. कदाचित आपण आपले स्वतंत्र कायमचे गमावून बसू. आणि असे होऊ नये म्हणून आपण जागृत राहून कार्य केले पाहिजे. आपल्या शरीरात रक्ताच्या शेवटच्या थेंब असेपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. असे मत त्यांनी त्यावेळेस व्यक्त केले होते.
डॉक्टर बाबासाहेबांच्या इतिहासाच्या खरा अभ्यास होता. आणि उत्क्रांतीची पायामुळे वाढू नये म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी याबाबत देखील त्यांनी अवगत केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की कोणी कितीही मोठा माणूस सत्तेत येऊ द्या जनतेने आपले स्वातंत्र्य त्याच्या पायाशी अर्पण करू नये, त्याच्यावर इतका विश्वास टाकू नका ही तो प्राप्त अधिकाऱ्यांच्या वापर करून लोकांसाठी निर्माण केलेल्या संविधानिक संस्थां उध्वस्त करेल. भारतात व्यक्ती पूजेचे फार मोठे स्तोम आहे. अध्यात्मात ही व्यक्ती पूजा कदाचित तुम्हाला आत्म्याची शांती प्रदान करेल मात्र राजकारणातील भक्ती ही अंतिमतः तुम्हाला हुकूमशाही कडे नेते असे देखील मत त्यांनी त्यावेळेस व्यक्त केले होते.

या सर्व बाबींच्या संदर्भ देत त्यांनी आपल्या व्याख्यानात इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालत समाज प्रबोधन केले. आणि म्हणून आता आपल्याला प्राणपणाने आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. जर संविधानाने तुमची रक्षण करावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याआधी तुम्ही संविधानाचे रक्षण करायला पाहिजे. आता कुणीही यापुढे महामानव निर्माण होणार नाही त्यामुळे आपले संरक्षण आपल्यालाच करावयाचे आहे. ज्यांना लोकांना गुलाम करायचे असते ते सर्वात आधी लोकांच्या मन मेंदूवर कब्जा करतात करतात. स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याची क्षमता नष्ट करतात. त्यामुळे आपण आपल्या तल्लक मेंदूच्या वापर करावा व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये मिळालेले ज्ञान सत्य नसते. त्यावर विश्वास न ठेवता पण आपल्या बुद्धीचा वापर करावा. तुम्ही न्यूज चैनल पाहणे देखील बंद करा कारण की आज-काल त्यात खोट्या बातम्या प्रसारित केल्या जातात. त्यावरील चर्चा ह्या देखील खोट्या दिशेने नेल्या जातात. हेच अंतिम सत्य आहे असे आपणास भासवले जाते. याच पद्धतीने प्रती कांतीची विषारी मुळे समाजात पसरली जातात.
त्यामुळे आपली स्वप्न मरू देऊ नका आपल्या महामानवांनी जे आपल्यासाठी जी स्वप्न बघितली यासाठी त्यांनी त्यांची हयात खर्च केली, ते स्वप्न पूर्ण करण्याची आता आपली जबाबदारी आहे.
असे मत त्यांनी व्यक्त केले. म्हणून संविधानाचे रक्षण आपण केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

सदरचा कार्यक्रम बुद्धिस्ट प्रबोधन मंच शिरपूर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून शिरपूर तालुक्याचे आमदार काशीरामजी पावरा तसेच बुद्धिस्ट प्रबोधन मंचचे सर्व सहकारी माजी नगरसेवक गणेश सावळे माजी नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाठ माजी नगरसेवक बापू थोरात, सामाजिक कार्यकर्ते प्रताप सरदार, यांच्यासह मोठ्या संख्येने दलित समाजबांधव व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध