Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ एप्रिल, २०२४

अरे बापरे हे काय शिरपूर शहरातील लेडीज होस्टेल मध्ये जादूटोणा ; तहसीलदारांना निवेदन तर पोलिसांकडे चौकशीची मागणी....!



शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर शहरातील करवंद नाक्यावरील मुलींच्या खासगी वसतिगृहात जादूटोणासदृश्य प्रकार घडल्याच्या माहितीने खळबळ माजली आहे. मुलींच्या रुममध्ये राहणाऱ्या एका परप्रांतीय मुलीद्वारेच हे प्रकार करण्यात आले असून ती फरारी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून कसून चौकशी सुरु आहे. शहरातील करवंद नाका परिसरात संबंधित वसतीगृह आहे. काही दिवसांपूर्वी संशयित मुलगी तेथे दाखल झाली होती. ती मुलगी इतर धर्मीय असल्याच्या देखील संशय व्यक्त केला जात आहे.

ती राजस्थानची रहिवासी असून शहरातील एका जे.ई.ई क्लासमध्ये शिकवण्यासाठी नियुक्ती झाल्याने राहण्यासाठी आली आहे, असे तिने सांगितले. तिच्या रुममधील मुलींच्या म्हणण्यानुसार,अन्य मुली झोपल्यानंतर ती मुलगी बॅगेतून चित्रविचित्र आकृत्या असलेले कागद काढून अगम्य भाषेत पुटपुटत असे. त्यानंतर रुममधील मुलींजवळ जाऊन त्यांना स्पर्श करीत असे. हा प्रकार त्या मुलींच्या लक्षात आला.

त्यांनी तिला जाब विचारल्याबरोबर तिने रूममधून पळ काढला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंदू राष्ट्रसेनेचे पदाधिकारी तेथे पोचले. त्यांनी या प्रकाराची माहिती मिळवली. त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलीशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र दरवेळी ती वेगवेगळी उत्तरे देत होती. तिचा खरा पत्ता कोणता, ती नेमक्या कोणत्या उद्देशाने शिरपूरला आली होती, त्या तांत्रिक क्रिया ती कशासाठी करत होती. तिला कोणाचे सहकार्य मिळत होते, तिने तिचा खरा पत्ता दिला की नाही असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. दरम्यान, येथील हिंदू राष्ट्र सेनेतर्फे प्रशासनाला निवेदन देऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली असून विशिष्ट उद्देशाने हे कृत्य केले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सदरचे निवेदन आनंद पाटील, दिनेश कोळी, नरेंद्र कोळी, राहुल भिल, देव तनेजा, तुषार बारी, विकास बागूल, चेतन धनगर, चेतन मराठे, योगेश माळी, नक्षत्र पाटील, शुभम सोनवणे, हर्शल माळी, मयूर ईशी, निखिल सूर्यवंशी, न्हानू येशी आदींनी दिले.

सोशल मीडियातून चर्चांना उधान

या प्रकाराबाबत समाज माध्यमांवरील बड्या हँडल्सवर माहिती टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या हँडल्सद्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह विविध पदाधिकाऱ्यांना टॅग करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी संबंधित वसतिगृहाला भेट दिली असून मुलींशी चर्चा केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध