Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० एप्रिल, २०२४

75 वर्ष काँग्रेसने आदिवासी समाजावर अन्याय केला - डॉ हिना गावित



शिरपूर प्रतिनिधी : - गेल्या साठ वर्षात काँग्रेस पक्षाकडून देशाचा विकास झाला नाही. नरेंद्र मोदींचे केंद्रात सरकार आल्याबरोबर गेल्या दहा वर्षात विकास कामांचा सपाटा लावून गोरगरीब जनतेपर्यंत योजना पोहोचण्याचे काम तळागाळातील कार्यकर्त्यांनी केले आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने विकासाच्या गप्पा मारू नये. या वर्षी अबकी बार मोदी सरकार ४०० के पार असा नारा सुरू असताना काँग्रेस पक्ष याचा अपप्रचार करीत हा असून असे झाल्यावर संविधान बदलून टाकतील,आरक्षण बंद होईल,पण काय कोणाचं काही गेलं नाही. त्या उलट आदिवासी समाजातल्या एका अत्यंत गरीब परिवारातल्या महिलेला आज देशाच्या सगळ्यात मोठ्या पदावर राष्ट्रपतीपदावर बसवायचं काम हे नरेंद्र मोदीनी केलं. आज पर्यंत काँग्रेस पक्षाने कधीही इतका मोठा निर्णय  घेतला नाही. पण आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने जर कोणी न्याय दिला असेल तर तो आपल्या भारतीय जनता पार्टीने दिला आहे.समाजाच्या विकासाबरोबर देशाची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. काँग्रेस पक्षाच्या काळात बाहेरील देश भारतावर आक्रमण करून निघून जायचे पण नरेंद्र मोदींचे केंद्रात सरकार आल्यावर जर कोणी भारतावर वाकडी नजर टाकली  तर भाजप सरकार त्याच्या देशात जाऊन सर्जिकल स्ट्राइक केल्याशिवाय राहत नाही.
आपल्याला जर देशामध्ये आपली सुरक्षा ही अशीच राहायला पाहिजे असेल,देश पुढे गेला पाहिजे असे आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर पुन्हा एकदा आपल्याला देशांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ.हिनाताई गावित यांनी बोराडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले.
       
बोराडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हिनाताई गावित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशीराम पावरा,भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.तुषार रंधे,समाज कल्याण सभापती कैलास पावरा,डॉ.कांतिलाल टाटीया, पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे,शिसाका संचालक जयवंत पाडवी,जि.प.सदस्य जताबाई पावरा,
प.स.सदस्य सरिताबाई पावरा,सरपंच सुखदेव भील, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मंजीत पवार,रमण पावरा,जगन पावरा,साहेबराव पाटील,भाजपा शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष के.डी.पाटील, संचालक राजेंद्र पाटील, पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, चोंदीचे सरपंच बापू पावरा, यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        
डॉ.हिनाताई गावीत पुढे म्हणाल्या की,केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात घरकुल योजना मंजूर झाली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदारांसाठी विविध योजना मंजूर करून आणल्या आहेत. काँग्रेस सरकारने गेल्या साठ वर्षात लोकांना फक्त आश्वासने दिली प्रत्यक्षात गरीब माणसाला घरकुल दिलेच नाही ते काम भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर दहा वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या केंद्रातल्या सरकारने ही योजना सुरू केली. आणि तुम्ही मला निवडून दिल्यामुळे तिथून जास्तीत जास्त घरकुल आपल्या मतदारसंघात मी आणायचं काम केलं. आज शिरपूर तालुक्यामध्ये २२ हजार पाचशे लोकांना आपण घरकुलं दिली आहे. तुम्हाला फक्त प्रधानमंत्री आवास योजनेतूनच घरकुले आपण दिली नाहीत तर वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना त्या त्या समाजासाठी राज्य सरकारने घरकुलच्या योजना तयार केल्या आहेत.
         
आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी  शबरी घरकुल योजनेमधून आदिवासी लोकांना आपल्या तालुक्यामध्ये सुमारे  २८००  घरकुल  मंजूर करून दिले आहे. रमाई घरकुल योजना सुरू आहे. यावर्षी आता राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या लोकांसाठी मोदी आवास योजना सुरू  केली आहे. वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरिबापर्यंत योजना पोहोचवायचं काम आपण करत आहोत.
       
जलजीवन मिशन ही योजना ही फक्त गावात किती लोक राहतात तेवढ्याच लोकांसाठी ही योजना नाही. तर तीस वर्षाचा आपण नियोजन केले करीत आहे.आज बोराडी गावांची  लोकसंख्या व ५२ गावाचे लोक बाजार करायला आपल्या बोराडी मध्ये येतात आणि हेच गणित करून  २०५३ वर्षांपर्यंत बोराडीची लोकसंख्या किती असेल तीस वर्षानंतर किती लोक आपल्या या ठिकाणी राहतील त्यांना किती पाणी लागेल किती मोठी पाण्याची टाकी लागेल किती मोठी पाईपलाईन लागेल याचा पूर्ण आराखडा करून आपण जवळपास १८ कोटी रुपयांची योजना आपल्या बोराडी गावासाठी आपण केंद्र सरकारकडे मंजुरीला पाठवली आहे. 
       
गावाला १००% घरांना घर घर से जल म्हणजे प्रत्येक घराला नळाने पाणी द्यायचं हा संकल्प असून 
जलजीवन मिशनच्या पाण्याच्या टाक्या तयार झाल्या असून त्या सर्व टाक्या आपल्या भारत सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मी आपल्या तालुक्यामध्ये मंजूर करून आणण्याचं सांगण्यात आले.
         
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांनी केले त्यांनी सांगितले की, बोराडीसह आदिवासी भागातील विकास कामे माजी शालेय शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल,आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित,खा.हिना गावित,आ. काशीराम पावरा व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत.आज प्रत्येक पाडा व गावाचा विकासासाठी  डॉ.हिना गावीत त्यांनी भरभरून निधी दिलेला आहे. म्हणून या पंचवार्षिक निवडणुकीत बोराडी गावासह तालुक्यातील मोठ्या मताधिक्याने डॉ. हिनाताई गावित या विजयी होतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
      
याप्रसंगी आ.काशीराम पावरा म्हणाली की, आपला तालुक्यात कुठलाही गट तट नाही सर्व नेते एकत्र आहेत.
तालुक्याचे नेते माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल,डाॅ.तुषार रंधे हे सर्व एकत्र आहे त्यापुढे आपल्याला ताईंना निवडून आणायचे आहे आपल्या तालुक्यासाठी चार नेते लाभलेला आहे आपले आदिवासी मंत्री डॉ.विजयकुमार गावित, माजी शिक्षण मंत्री अमरीश भाई पटेल,डॉ.हिना गावीत मी आमदार म्हणून काम करित आहे. या दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघांमध्ये आणखी चांगले विकास करून घ्यायचं असेल तर आपल्याला डॉ.हीना गावीत यांना मतदान करायचे आहे. आपल्या शिरपूर आमदार कार्यालयात तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कामे वेळेवर व मोफत होण्यासाठी सत्तर मुलांची संगणकीय टीम तयार करण्यात आलेली आहे. दररोज शेकडो लोक येऊन विविध योजनांचे फॉर्म व इतर कामे करून घेऊन जातात. जनतेची सेवा हीच आपलं  आद्य कर्तव्य असल्याचे मत आमदार काशीराम पवार यांनी सांगितले.
        
याप्रसंगी डॉ.तुषार रंधे म्हणाले की,आदिवासी विभागाकडून आता ओ.बी.सी व इतर समाजातील लोकांना काही योजना मिळणार आहे. यामध्ये  ट्रॅक्टर खरेदी,नागर खरेदी,शेती उपयोगी साहित्य खरेदी,किंवा हार्वेस्टर खरेदी करायचे असेल शेतकऱ्यांना त्या वस्तूंवरचं व्याज आणि त्या वस्तूला सबसिडी ही आदिवासी विभागाकडून  मिळण्यासाठी डॉ.विजयकुमार गावितांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला देखील यश आलेले आहे. त्यांनी आपल्याला दि. १३ मार्चच्या  मिटींगचा मंत्रिमंडळाचा जीआर देखील  दिलेला आहे. म्हणून आपल्याला ओबीसींना काही मिळत नाही. अशातला दुराभाव करण्याचा काम आता नाही. त्या सर्व योजनांसाठी आपण देखील त्यांच्याकडे तेवढाच पाठपुरावा करतोय आणि तेवढ्याच सकारात्मक निर्णय त्यांनी घेतला आहे.आदिवासींसाठी असा कुठलाही फरक आणि कुठलाही दुजाभाव न करता १०० टक्के योजनांचा लाभ येत्या काळात मिळणार आहे.
         
जिल्हाध्यक्ष बबन चौधरी म्हणाले की,लोकसभेमध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये २०१४  मध्ये  ५२००० व  २०१८ मध्ये ४८ हजारच मताधिक्य डॉ.हिनाताईंना मिळालं होता. आतातर आपल्या सोबत आमदार अमरीश भाई पटेल आमदार काशीराम पावरा सोबत असताना शिरपूर तालुक्यातील दीड लाखांच्यावर मताधिक मिळणार असल्याचे सांगितले.
        
भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मंजीत पवार म्हणाले की,आदिवासी भागातून डॉ. हिनाताई गावित  यांना मोठ्या प्रमाणावर मते मिळणार असून त्यांनी केलेले काम व प्रत्येक गावांना दिलेल्या भेटी यामुळे मतदारांच्या मनात डॉ.हिनाताईच निवडून येण्याचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.      
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शर्मा यांनी केले. तर आभार प्रदर्शन बोराडी ग्रामपंचायतचे उपसरपंच राहुल रंधे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध