Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ एप्रिल, २०२४

राज्यातील मराठा समाजाच्या मतांवर 36 जिल्ह्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच भवितव्य अवलंबून!



मुंबई.सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 36 जिल्ह्यातील 48 लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची मते निर्णय ठरणार असल्याने मराठा समाजाच्या मतांवर 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये चर्चिले जाऊ लागली आहे
राज्यात 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे त्यातच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचे नाहीत अशी घेतलेली भूमिका तसेच कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभांना मराठ्यांनी जायचे नाही ज्याने त्याने आपला निर्णय घ्यायचा ज्याला पाडायचे त्याला पाडा ज्याला मते द्यायची त्याला द्या पण ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही त्यांचा कार्यक्रम मात्र नक्की करायचा ज्यांनी आपल्या आया बहिणींची डोके फोडली त्यांना विसरू नका आपल्या मराठा मावळ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका मराठा मावळ्यांवर झालेल्या गुन्ह्यांची त्यांना जाणीव करून द्या सगे सोयरे मुद्द्याच्या अंमलबजावणीवर आपण ठाम राहायचे विधानसभेला पाहू अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याने सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवारांचे भवितव्य मराठा समाजाच्या मतांवर अवलंबून असल्याचे निष्कर्ष राजकीय चाणक्यांकडून वर्तवले जात आहेत
राज्यातील एकही मराठ्यांनी जातीशी गद्दारी करू नये मराठ्यांची ताकद एकी आणि नेकी दाखवण्याची ही संधी आहे असे आव्हान सकळ मराठा समाजाकडून मराठा समाजातील तरुणांना समाजाच्या माध्यमातून संदेश दिले जात आहे आगामी काळातील निर्णय सर्व विचारवंत,डॉक्टर्स, वकील, लेखक,साहित्य व समाजातील इतर जेष्ठ विचारवंतांनी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा. असे आव्हान मराठा समाजाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज माध्यमातून चालू झाले असल्याने मोठ्या प्रमाणावर सर्वच राजकीय पक्षांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होणार आहे मराठ्यांच्या मतांसाठी त्यांना हाजी हाजी करावे लागणारे एवढे मात्र निश्चित आहे
राज्यातील .36 जिल्ह्यातील 48 लोकसभा  मतदारसंघात मराठा समाजाची मते निर्णायक ठरत असून ही मराठा समाजाची मते या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या मतदारांना विजयाकडे नेण्याची त्यांची ताकद असल्याने या मराठा समाजाच्या मतांसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आता कंबर कसली आहे त्यासाठी मराठा समाजातील गावागावातील कार्यकर्त्यांना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपलेसे करण्याचा प्रयत्न चालू केला आहे मात्र ज्या मराठा समाजातील नेत्यांवर व गाव पातळीवरील कार्यकर्त्यांवर मागील काही काळापासून अन्याय करणाऱ्या नेत्यांना चांगला धडा शिकवण्याचा निर्धार मराठा समाजातील नेत्यांनी ठामपणे घेतल्याने सर्वच राजकीय पक्ष धास्तावले आहेत
राज्यातील कोणत्या जिल्ह्यात मराठा समाजाची मते किती आहेत त्याची इत्यंभूत आकडेवारी पुढील प्रमाणे: गडचिरोली 98,400 नंदुरबार एक लाख 37 हजार ,गोंदिया दोन लाख बारा हजार पाचशे,भंडारा दोन लाख 44 हजार 500 ,चंद्रपूर दोन लाख 47 हजार 800 ,वर्धा दोन लाख 59 हजार, वाशिम तीन लाख 57 हजार 700, अकोला चार लाख वीस हजार, जालना चार लाख 27 हजार 500 ,धुळे चार लाख 65 हजार चारशे, सिंधुदुर्ग चार लाख 73 हजार दोनशे, हिंगोली 4,74200, अमरावती सहा लाख तीस हजार नऊशे ,बुलढाणा सात लाख 59000,धाराशिव सात लाख 27 हजार ,परभणी सात लाख 28 हजार 300 ,यवतमाळ सात लाख 54 हजार 700, नागपूर सात लाख 82 हजार 600 ,नांदेड 8,30000 ,रत्नागिरी आठ लाख 49 हजार 300 ,मुंबई शहर आठ लाख 69 हजार 900,  लातूर नऊ लाख 68 हजार 800 ,संभाजीनगर 11 लाख 99 हजार, पालघर 11 लाख 52 हजार 400, जळगाव 15 लाख 9 हजार ,सांगली 15 लाख 98 हजार दोनशे ,रायगड 16 लाख 56 हजार दोनशे ,सोलापूर 19,55,700,सातारा 21 लाख 15हजार, नाशिक 21 लाख 98 हजार 800, अहमदनगर  25 लाख 48000, कोल्हापूर 25 लाख 56 हजार ,ठाणे 30 लाख 14 हजार, मुंबई उपनगर 35 लाख 34000 ,पुणे 48 लाख 63 हजार दोनशे,
राज्यात 32 टक्के मराठा समाज असताना दहा टक्के आरक्षण कशी विश्वाटके आरक्षण पाहिजे अशी मराठा समाजाची पूर्वीपासून मागणी आहे सरकारने मराठ्यांची फसवणूक केली दुधाची तहान मृगजळावर भागवली अशी मराठा समाजाची भावना झाली आहे इतर सर्व प्रवर्गांना लोकसंख्येच्या 50 टक्के आरक्षण मराठा समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत फक्त दहा टक्के आरक्षण त्यामुळे मराठा समाज पूर्णपणे नाराज आहे त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील भवितव्य हे मराठा समाजाच्या मतांवर अवलंबून असल्याचे मराठा समाजातील प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध