Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ११ मार्च, २०२४

शिरपूर शहरात जागतिक महिला दिन उत्सवात साजरा...



धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महिला महामंडळाच्या प्रदेश अध्यक्ष्या सौ भारतीताई सोनवणे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शिरपूर नगरीच्या माजी नगराध्यक्ष संगीताताई देवरे, पीएसआय छाया पाटील मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या वृषाली हिरे मॅडम, माजी नगरसेविका मनिषा ताई सोनगडे, प्रभारी बालविकास अधिकारी वैशालीताई निकम,महाराष्ट्र नाभीक महामंडळ जिल्हाध्यक्षा हेमलता ताई ईशी, उपाध्यक्षा पल्लवी ताई शिरसाठ उपस्थित होत्या. प्रथम नारी शक्तीचे आराध्य दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संत सेनाजी महाराज, वीर जीवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित विविध क्षेत्रातील नामवंत महिला मान्यवरांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र नाभिक महिला कर्मचारी महामंडळ या संघटनेची स्थापना करून या संघटनेसाठी जिल्हाध्यक्ष म्हणून रंजनाताई सूर्यवंशी,उपाध्यक्षा सुचेता सनेर, सचिव ज्योती सोनवणे,तालुका अध्यक्षा प्रा.सपना सोनगडे,उपाध्यक्षा सूवर्णा ईशी,सचिव संगीता वारुळे यांची नियुक्ती करण्यात आली.व नियुक्ती पत्र व पुष्गुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर सुरेश सैदाणे यांनी सुचवलेल्या माझा समाज माझा अभिमान या स्टिकरचे अनावरण करण्यात आले. उपाध्यक्षा पल्लवी शिरसाठ यांनी नारी शक्ती व महीलाचे समाज विकासातील योगदान व भूमिका याविषयी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला नाभिक समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष भीमराव वारुळे,राज्य कार्यकारिणी सदस्य नरेंद्र खोंडे, प्रा. राजेंद्र शिंदे,धुळे शहराध्यक्ष दत्तात्रय सैदाणे,संघटक धनराज पगारे, प्रसिध्दी प्रमुख विशाल चित्ते,सदस्य दीपक चित्ते व समाज बांधव भगिनी  उपस्थित होते. त्यानंतर महिलांसाठी स्री घराची माणिक खांब या विषयावर प्राचार्य डॉ.संजीव गिरासे यांचे व्याख्यान घेण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र येशी,जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विकास सेन,
रावसाहेब पद्माकर शिरसाठ, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप येशी,उपाध्यक्ष रवींद्र खोंडे, तालुका अध्यक्ष नंदकुमार बोरसे,शहराध्यक्ष रामचंद्र पवार,तालुका सचिव गोपाल वरसांले,शहर सचिव प्रताप सोनवणे,
खजिनदार रवींद्र सोंनगीरे,जिल्हा संघटक सी.के.महाले सदस्य जितेंद्र सनेर,महामंडळाचे सचिव संजय वरसांले यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका कांचन निंबाळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्षा पल्लविताई शिरसाठ यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध