Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ मार्च, २०२४

शेणपूर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धाडणे अंतर्गत पल्स पोलिओ मोहीम आरोग्य विभागाकडून संपन्न




आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र धाडणे अंतर्गत येथे पल्स पोलिओ मोहीम मौजे शेंनपूर गावात मोठ्या उत्साह राबविण्यात आले
साक्री तालुका आरोग्य विभाग वतीने कासारे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत धाडणे आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे शेंनपुर मलांजन परिसरामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा हिवता अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेनपुर मलाजन परिसरामधील सर्व शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना आज पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत पोलिओचे डोस मोफत देण्यात येत आहे यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी बंधू भगिनी यांच्या माध्यमातून जनजागृती व नियोजन करण्यात आलेले असून कार्यक्षेत्रामध्ये एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता स्वतः वैद्यकीय अधिकारी सौ गायत्री अहिरे व कुमारी डॉक्टर मॅडम भूमिका वाडीले यांनी घेतली असून या सर्व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून सर्वांना प्रशिक्षक देऊन त्या माध्यमातून कार्यक्षेत्रामध्ये एकूण 340 डोस पाजण्याची व्यवस्था केलेली आहे सकाळी नऊ वाजेला लसीकरणाची सुरुवात कु. जिया चंद्रशेखर अहिरराव हिला लसीकरण करून करण्यात आली तसेच गावातील शेत कामगार शेतात असलेली घर या ठिकाणी जाऊन शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना डोस पाजण्याचे काम करणार आहेत या अनुषंगाने शेनपूर गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य या सर्वांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी धाडणे पी एस सी चे डॉ.निकम अंगणवाडी सेविका शोभा पगारे सहाय्यक सीमा थोरात तसेच मदतनीस ज्योती पगारे व आरोग्य सेविका अशा वर्कर सौ.सुवर्णा काकुस्ते यांचे विशेष योगदान लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध