Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ मार्च, २०२४

शेणपूर गावात काल रात्री दोन ठिकाणी धाडसी घरफोडी हजारो रुपयांच्या मुद्देमालासह सोने केले लंपास



काल पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील शेणपुर येथे दोन घरांमध्ये धाडसी चोरी झाल्याचे निष्पन्न झाले काल मध्य रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सेणपूर येथील भर वस्तीत घर असणाऱ्या श्री राजेंद्र महारु शिंदे यांच्या घरात धाडसी चोरी केली त्याचवेळी काही अंतरावरच असलेल्या कै दयाराम लोटन पगारे शेणपूर यांचे देखील घर चोरट्यांनी कुलूप तोडून काही मौल्यवान दागिने व रोकड लांबविले असे त्यांच्या पत्नीकडून कळाले आहे. दोन्ही चोऱ्या ह्या एकाच वेळी झालेल्या असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले आहे श्री राजेंद्र महारु शिंदे यांच्या घरातील काही सोन्याचे ऐवज व काही रोकड कॅश चोरट्यांनी चोरून नेली असल्याचे त्यांच्या घरच्यांकडून माहिती मिळाली आहे.दोन्ही घरे हे गेल्या दोन चार दिवसापासून बंद अवस्थेत होते याचाच फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. सध्या शेणपूर गावात अज्ञात फेरीवाले विक्रेते यांचे प्रमाणी वाढले आहे त्यामुळे लोकांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे तरी यापुढे गावातील सर्व नागरिकांनी सतर्क राहून प्रत्येक फेरीवाल्याचा आधार कार्ड बघून खात्री करणे आवश्यक आहे अशी माहिती शेणपूर गावचे पोलीस पाटील हेमराज काळे यांनी गावकऱ्यांना दिली गेल्या सहा महिन्यापूर्वी देखील अशीच एक धाडसी लाखो रुपयांची घरपोडी या गावात झालेली होती या सर्व चोऱ्यांचा शोध घेणे पोलीस प्रशासनासाठी आता चॅलेंज बनले आहे या घटनेचा पुढील तपास साक्री पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रौंदळ साहेब करीत आहेत.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध