Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १० मार्च, २०२४

आ.अमरिशभाई पटेल, आ. काशिरामदादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला २० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर...



शिरपूर प्रतिनिधी : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिरामदादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला २९ फेब्रुवारी च्या शासन निर्णयानुसार १० कोटी व ५ मार्च च्या शासन निर्णयानुसार १० कोटी असे एकूण २० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : नपावै-२०२३/प्र.क्र.७६५ (३२)/नवि-१६ (ई-६८३२६३) मंत्रालय, मुंबई-४०००३२ दि. २९ फेब्रुवारी २०२४ अन्वये शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी १० कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यात आले. यात शिरपूर वरवाडे नगरपरिषद संचलित मुकेशभाई पटेल अम्युजमेंट पार्क मध्ये म्युझिकल फाउंटेन बनविणे व बगीच्याचे नुतनीकरण तसेच डॉ. श्यामप्रसाद उद्यानात फाउंटेनचे काम करणे या कामासाठी ५ कोटी रुपये व शिरपूर वरवाडे नगरपरिषद मालकीच्या पित्रेश्वर कॉलनी जवळील स.न. १६९/२ च्या जागेवर दुकान केंद्र व हॉलचे बांधकाम करणे यासाठी ५ कोटी रुपये असे एकूण १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच शासन निर्णय क्रमांक : नपावै-२०२४/प्र.क्र.४० (२१)/भाग-१/नवि-१६ (ई-७३१३७१), दि. ५ मार्च, २०२४ अन्वये पुन्हा १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात शिरपूर शहरात अरुणावती नदी जवळ बगीचा बनविणे व त्या संलग्न आवश्यक कामे करण्यासाठी ३ कोटी रुपये, शिरपूर शहरात पाणी पुरवठा वितरण करणेसाठी पाईपलाईन करणे व पाणी मीटर बसविणे यासाठी १ कोटी रुपये, शिरपूर-वरवाडे नगर परिषद अभिलेख विभागाचे नुतनीकरण, सिव्हील वर्क, फर्निचरचे काम करणे १ कोटी रुपये, शिरपूर वरवाडे नगर परिषद मालकीच्या सुभाष कॉलनी समोरील जागेत व्यापारी संकुल बनविणे ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

याप्रमाणे  २० कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर केल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांचे शिरपूर शहरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध