Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ७ मार्च, २०२४

आईवडिलांची सेवा आणि आज्ञापालन यांचा आदर्श घेत आण्णासाहेब एन.डी. मराठे विद्यालयात मातृ-पितृ पूजन दिवस साजरा....



शिंदखेडा प्रतिनिधी- शहरातील आण्णासाहेब एन.डी.मराठे विद्यालयात आईवडिलांची सेवा आणि आज्ञापालनाचा आदर्श घेत मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात शाळेतील बालगोपालांनी आपल्या शब्दांमधून आईवडिलांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केले. तसेच सौ. दिपाली कल्याण पाटील सौ.सुरेखा गणेश आहेर सौ. ज्योती दिनेश देसले सौ. जागृती गिरीश जाधव सौ.मनीषा प्रशांत जाधव श्री. राकेश खलाणे श्री.प्रशांत जाधव या पालकांनी विद्यार्थ्यांसमोर आईवडिलांचे आपल्या जीवनातील महत्त्व मनोगतातून व्यक्त केलं. 

यावेळी पालक म्हणाले की,
आईवडिलांना देवासमान स्थान देणार्‍या संस्कृतीत आईवडिलांच्या आज्ञापालनाचा आणि सेवेचा सर्वोत्तम आदर्श अनेकांनी आपल्यासमोर ठेवला आहे. प्रभु श्रीराम हे अवघ्या भारताचे आराध्यदैवत आहेत. त्यांनी आई-वडिलांच्या आज्ञापालनाचा सर्वोच्च आदर्श घालून दिला.श्रावणबाळाने अंध आईवडिलांची अथक सेवा केली.अशी असंख्य उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. आईवडिलांच्या आपल्यावर असणार्‍या उपकारांची जाण ठेवून त्यांची अविश्रांत सेवा करणे ही काळाची गरज आहे. असे मत पालकांनी व्यक्त केले.
   
या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमोल मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमास असंख्य माता-पिता पालकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती तृप्ती अहिरराव यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध