Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ मार्च, २०२४

रॉयलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्सहात...


परंडा (राहूल शिंदे) दि.०२ तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल या प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सावित्रीबाई फुले -राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेची पूजा व दिप प्रज्वलन करून जिजाऊ वंदनेने सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन माजी. आमदार सुजितसिंह ठाकूर, धाराशिव जि.प चे मा. उपाध्यक्ष धंनजय सावंत, यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सुभाषराव मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा आशाताई मोरजकर, आंबी पोलीस स्टेशेनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड, आनाळा नगरीच्या विद्यमान सरपंच अंबिकाताई ज्योतीराम क्षिरसागर, मराठा सेवा संघाचे ता.अध्यक्ष गोरख मोरजकर, ज्योतीताई धंनजय सावंत, पवार उद्योग समूहाचे मालक रामचंद्र पवार, अँड.अजय खरसडे, आनाळा ग्रा.प.चे उपसरपंच दादासाहेब फराटे, कल्पनाताई मोरे, भाजपा तालुका उपअध्यक्ष हरीभाऊ शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर व संस्थेच्या सर्वेसर्वा प्रियंका निशिकांत क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांनी विविध भक्तीगीते, कोळीगीते, लावणी, हिंदी मराठी गीतांची धमाल यासह विवीध कला सादर करुण उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी प्रगतीशील शेतकरी बिभिषण शिंदे, जोतीराम क्षिरसागर, आनाळा ग्रा.प. सदस्य अशोक शिंदे, अजित शिंदे, चांगदेव चव्हाण, विनोद कदम, भाऊसाहेब क्षिरसागर, हनुमंत क्षिरसागर, अंबादास क्षिरसागर, जि.प शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत साळुंखे, पो.कॉ. रामकिसन कुंभार, पोलीस हे.कॉ खैरे मॅडम, उदयोजक मारूती शेळवणे, जयसिंग चौघुले, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत जगताप, प्रिया देशमुख, उषा क्षिरसागर, कविता जगताप, नम्रता क्षिरसागर, श्वेता गायकवाड, काजल आवाळे, आंबादास गायकवाड, विकास हगारे, कैलास थोरात, आजिनाथ मोरे, श्री मोरे, बालाजी गरड, विकास हगारे, बाबासाहेब गायकवाड, आदीनी परिश्रम घेतले, स्नेहसंमेलनातुन देशसेवा, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, फातिमा शेख यांचे विचार सादरीकरणून प्रेक्षकांसमोर मांडले. महिला सक्षमीकरण तसेच लेक वाचवा, लेक शिकवा यावर प्रकाश टाकला विविध कलागुणातून रॉयल कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली . यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध