Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ मार्च, २०२४
Home
/
Unlabelled
/
भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे - शेवटपर्यंत फक्त ओबीसीसाठीच लढेल - मंत्री छगन भुजबळ
भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे - शेवटपर्यंत फक्त ओबीसीसाठीच लढेल - मंत्री छगन भुजबळ
नाशिक,येवला,दि.३ मार्च :- ओबीसी समाजातील अनेक जातीत पोटजाती आहे. जर आपल्या आपले न्याय हक्क मिळवायचे असतील तर ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं. तसेच ओबीसीमध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोटजातीनी एकत्र येऊन भोई म्हणून एक छताखाली यायला हवं असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महात्मा फुले नाट्यगृह येवला येथे आज भोई समाज आरक्षण एल्गार बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
येवला आमदार नरेंद्र दराडे, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्या.चंद्रकांत मेश्राम, रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे, ज्ञानेश्वर खैरमोडे, गणेश सपकाळ, संतोष सासे, संतोष सोपे, संदीप डहाके, दिपक वाघ, योगेश आडने, संभाजी लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला कुठलाही विरोध नव्हता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी आपली मागणी होती. आता मराठा समाजाला स्वतंत्र आणि टिकणार आरक्षण देण्यात आलं आहे. तसेच ओबीसीतील सर्व घटकांनी एकत्र आले तरच प्रश्न सुटतील. तसेच देशात जातनिहाय जनगणना करणे ही आपली मागणी आहे. त्यामुळे सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येऊन लढल पाहिजे असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भोई समाज हा राजकीय दृष्ट्या आजही दुर्लक्षित आहे. त्यामुळे भोई समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारणात यावं. समाजात पालखी उचलणाऱ्या या भोई बांधवांनी आता पालखीत बसायला शिकल पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित बांधवांना केले. तसेच भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन रोटी बेटीसह सर्व व्यवहार करत आपल्या समाजाची प्रगती करावी असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार नरेंद्र दराडे, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्या.चंद्रकांत मेश्राम, दौलतराव शितोळे, ज्ञानेश्वर खैरमोडे, गणेश सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे प्रतिनिधी :- काल धुळे शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ची शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली, यात्रेत जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे आणि ...
-
अमळनेर प्रतिनिधी : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी नणंद व तिच्या प्रियकराला न्यायालयाने २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अवघ्या तीन तासात पोलिस...
-
मुंबई, दि. २७: - राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव...
-
दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी 1972 मध्ये मुकटी धुळे गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.काँग्रेस पक्षात युव...
-
धुळे (प्रतिनिधी) येथील स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासन विभागाने गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी संयुक्तरित्या शहरातील मिरची मसाल्या...
-
गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खत शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत तक्रा...
-
मुंबई, दि. २४: राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्...
-
नाशिक, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत.त्यांनी शेतकरी,कामगार,महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्...
-
पिंपळनेर,दि.21साक्री तालुक्यातील जैताणे येथे प्रेयसीसोबत गप्पा मारणार्या आदिवासी भिल समाजाच्या तरूणास बेदम मारहाण करण्यात आली.उपचारादरम्यान...
-
वर्णेश्वर मंदिर संस्थेसह ग्रामिण भागातील मंदिरांचा समावेश-मंत्री अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर-महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा