Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ७ मार्च, २०२४

अहिंसा बी टेक महाविद्यालयात क्रीडामहोत्सव आणि सांस्कृतिक दिन उत्साहात साजरा...



दोंडाईचा प्रतिनिधी:- दोंडाईचा येथील वर्धमान एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बी टेक) कॉलेजमध्ये क्रीडा सप्ताह झाला. यात विविध मैदानी खेळांसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

कार्यक्रमाचे उ‌द्घाटन प्राचार्य डॉ .एन. एस पाटील यांनी केले. त्यांच्यासमवेत महाविद्यालयाचे विभागप्रमुख उपस्थित होते. प्राचार्य डॉ .एन. एस पाटील म्हणाले, की विद्यार्थांना अभ्यासासह राष्ट्रीय खेळांकडेसुद्धा लक्ष देऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.

क्रिकेट या मैदानी खेळात कु.सोहेल शेख याच्या संघाने विजेते पद पटकविले व तसेच कु.विजय धनगरे याचा संघ उपविजेते पद पटकविले आणि कबड्डी या खेळात कु.नंदराज बागल याच्या संघाने प्रथम विजेतेपद पटकविले व कु.स्वामीराज गोसावी याचा संघ उपविजेता ठरला. 
डॉजबॉल या महिला खेळात कुमारी . पियुषा बेंडाळे हिच्या संघाने प्रथम विजेते पद पटकविले व कुमारी वैष्णवी पाटील हिचा संघ उपविजेता ठरला व तसेच कॅरम या खेळात कु.तुषार अहिरे हा विजेता ठरला व कुमारी  कुमारी  धनश्री भावसार हि उपविजेता ठरली . सर्व विद्यार्थांना  महाविद्यालयाचे प्रा.  श्री.हरेश दानाणी,प्रा.संदीप वेंदे ,प्रा. कुमारी दर्शना साठे ,प्रा.कुमारी ममता कानडे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले . 

सर्व विजेत्या खेळाडू व संघाचे संस्थेचे अध्यक्ष राजेशजी मुणोत,तसेच कार्यकारी संचालक सौरभजी मुणोत व  प्राचार्य .डॉ.एन.एस पाटील ,  प्रशासकीय अधिकारी दीपेश कर्नावट, सर्व विद्या शाखांचे प्राचार्य यांनी कौतुक केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध