Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ मार्च, २०२४

मुख्याध्यापकाला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक...



धुळे प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्यातील कुसुंबा या ठिकाणी असलेल्या सोशल अँड कल्चरल असोसिएशन संचलित आदर्श हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

आदर्श हायस्कूल या ठिकाणी उपशिक्षिका पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदार महिलेकडे शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमासाठी खर्चझाल्याच निमित्त करून शाळेतील सर्व कार्यरत शिक्षक यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी आठशे रुपये जमा करण्यासाठी बैठक घेतली होती.दरम्यान मुख्याध्यापकाच्या या निर्णयाचा तक्रारदार विरोध दर्शवला यामुळे आरोपी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी याने तक्रारदार शिक्षिकेला पैसे दिल्याशिवाय हजेरी रजिस्टर वर सही करण्यास नकार दिला. यामुळे मुख्याध्यापकाने आपल्याकडे एक हजार रुपयाची लाच मागितली असल्याची तक्रार संबंधित महिला शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा रचत आदर्श विद्यालय मधील मुख्याध्यापक कक्षामध्ये लाज स्वीकारत असताना परदेशी याला रंगेहात अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी याच्यावर धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे,पोलीस निरीक्षक मनजीत सिंह चव्हाण,पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे यांच्यासह पथकाने पार पाडली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध