Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १० मार्च, २०२४

शिवसेवा मित्र मंडळ आयोजित ॲड.विशाल लांजेकर, यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.



ठाणे  (विश्वनाथ पंडित) शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व यांच्या वतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक प्रक्रिया, इच्छापत्र (WILL) आणि बक्षीसपत्र (Gift Deed) या विषयातील तज्ञ, ॲड.विशाल लांजेकर यांच माहितीपूर्ण मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक प्रक्रिया समजावून सांगताना ॲड.विशाल लांजेकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण कायद्यातील महत्त्वाच्या बदलांच विश्लेषण आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया उपस्थित श्रोत्यांना सोप्या शब्दात समजावून सांगितली.इच्छापत्र (WILL) आणि बक्षीसपत्र (Gift Deed) विषयी माहिती देतांना ॲड. विशाल लांजेकर यांनी या दोन्ही विषयाचं वेगळेपण आणि ही दोन्ही पत्र प्रोसेस करताना कोणत्या आवश्यक कायदेशीर बाबींच पालन करणे महत्वाचं आहे , त्याला लागणारे रजिस्ट्रेशन प्रोसेस, चार्जेस, तसेच इच्छापत्र (WILL) आणि बक्षीसपत्र (Gift Deed हे कोणी? का? केव्हा ? आणि कधी? करणे आवश्यक आहे हे उदाहरणासहीत समजावून सांगितल.उपस्थित श्रोत्यांच्या या तीनही विषयांवरील विविध प्रश्नउत्तरांनी या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा समारोप झाला.सदर कार्यक्रमास ठाणे मुंबई परिसरातील श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात मंडळाचे कार्याध्यक्ष  गिरीश राजे, उपाध्यक्ष सुभाष परब, सचिव सुभाष करंगूटकर, खजिनदार अमित ताम्हनकर, जेष्ठ सभासद अक्षर पारसनीस, हेमंत प्रधान आणि प्रशांत मोहिले यांच मोलाच सहकार्य लाभलं.  

विश्वनाथ पंडित

९५८८४५०४४२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध