Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ मार्च, २०२४

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रा.विद्यालय साक्री यांच्या जल जीवन मिशन प्रचार व प्रसार निबंध स्पर्धेत चि.गुंजन काकुस्ते याने जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांका पटकावला



जल जीवन मिशनच्या प्रचार प्रसार तसेच प्रसिद्धी साठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दि.6 डिसेबर 2023 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत  या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. साक्री तालुका स्तरीय स्पर्धेचा निकाल जिल्हा समिती कक्षात प्राप्त होत असतो. त्यातून धुळे जिल्हा समितीकडून सदर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात साक्री येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर  प्राथमिक विद्यालय साक्री या शाळेतील इयत्ता ४थी तील विद्यार्थी चि. गुंजन प्रविण काकुस्ते शेणपूर याचा द्वितीय क्रमांक धुळे जिल्हा समिती कडून जाहीर करण्यात आला आहे एवढेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय साखरी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये सन 2022 या वर्षात शालेय अभ्यास खेळ विविध स्पर्धा प्रज्ञाशोध परीक्षा तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवल्यामुळे चिरंजीव गुंजन काकुस्ते याला तेरा वेगवेगळ्या पारितोषिकांनी सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे तसेच यावेळी देखील साक्री तालुका स्तरी वरील शाळेतील शिक्षकांकडून या विद्यार्थीच शाळा समितीतर्फे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी धुळे जिल्हा जलजीवन मिशन प्रचार व प्रसार निबंध व चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना
आयोजकांकडून आर्थिक स्वरूपात साडेपाच हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते व त्यांना अशा सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते या उदात्त हेतूने जिल्हा समितीने हे योगदान दिले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्रासह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध