Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय संमेलन 10 मार्चला साक्री(धुळे )आयोजन...



कायद्याचा वापर करीत भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम कायदा प्रेमींसाठी राज्यस्तरीय संमेलन 10 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका साक्री येथे भरविण्यात येणार आहे. संमेलनाची जोरदार तयारी सुरू असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक माहिती अधिकार, सेवा हमी कायदा, ग्राहक संरक्षण व इतर कायद्यातील ज्ञानाचा वापर करून भ्रष्टाचार विरोधी लढा देणारे कायदाप्रेमीं करीता संमेलन, चर्चासत्र, कार्यशाळाचे आयोजन निलेश तोरवणे, सुरेंद्र भदाणे व महाराष्ट्रातील कायदा प्रेमींनी केले आहे. खानदेश मधील धुळे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका साक्री हे स्थान निश्चित करण्यात आले. 

त्या अनुषंगाने संमेलनाची जोरदार तयारी सुरू असून कायदा प्रेमी सह सुजाण नागरिक सहभागी होत आहेत.
 सदर संमेलनास न्यायमूर्ती श्री. वसंत शिवराम पाटील, उच्च न्यायालय, माझगाव (डॉक) मुंबई हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच प्रमुख व्याख्याते श्री. अरुण अहिरराव ( भारतीय राज्यघटना व भारतीय कायदे तसेच भारतीय प्रशासनाचे गाढे अभ्यासक ), ॲड.श्री.चंद्रकांत येशीराव (मा. सदस्य, ग्राहक तक्रार निवारण मंच ) यांचे कायदेविषयक महत्वपूर्ण मार्गदर्शन व्याख्यान होणार असून माहिती अधिकार कायद्यावर शुभराज गजरे, सर आणि श्री. गणेश शिंदे सर, साक्रीचे भूमिपुत्र, (मा.अ अ.राष्ट्रीय प्रवीण प्रशिक्षक.) यांच्याकडून अनमोल अनमोल माहिती व्याख्यान व सूचना कायदा प्रेमींना देणार आहेत.
 साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, पिंपळनेर रोड, साक्री येथील सभागृहात सदरचे संमेलन भरविण्यात येणार आहे. 

संमेलनात सहभागी होणारे कायदाप्रेमींसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर संमेलनात भारतीय संविधान तसेच भारतीय कायदे, सामान्य व्यक्तीचे अधिकार, ग्राहकांचे अधिकारासह कायद्याद्वारे प्राप्त सर्व अधिकारासंबंधीत तज्ञ,अभ्यासक व्यक्तींकडून मार्गदर्शन लाभेल. वर्तमानात भ्रष्टाचारासंबंधीत लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्भवणाऱ्या समस्या बाबतीत तसेच कायदेशीर प्रक्रियेत उद्भवणाऱ्या समस्ये संबंधित दुपारच्या सत्रात सन्माननीय कायदा प्रेमींचे कायद्यासंबंधीत चर्चासत्र साठी सुद्धा वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. या कायदाप्रेमी आयोजित राज्यस्तरीय संमेलन या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कायदा प्रेमींना प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याबरोबरच कायद्याचा वापर करून भ्रष्टाचार विरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व नवीन कायद्याविषयी आवड असणारे अभ्यासू कार्यकर्त्याना सन्मानित करण्यात येणार आहे. 

संमेलनात सहभागी होणाऱ्या कायदाप्रेमींनी श्री. निलेश तोरवणे - 7756930103, श्री. सुरेंद्र भदाणे - 7588518129, श्री. माधवराव दोरीक - 9960223278 यांच्याशी दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपले नाव नोंदणी करून घ्यावे.

भ्रष्टाचार मुक्त लढा देणाऱ्या व भ्रष्टाचार मुक्त भारताची स्वप्न पाहणाऱ्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना या संमेलनात सहभागी करून घ्यावे असे आवाहन धुळे जिल्ह्यासह तमाम महाराष्ट्रातील कायदाप्रेमीं तर्फे कायदाप्रेमींसाठी व जागरूक नागरिकांना करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध