Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

शिरपूर तालुका पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत आलेल्या टोळीला केले जेरबंद.



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांनी दरोड्याच्या पूर्वतयारीने राजस्थान राज्यातून आलेल्या टोळीतील चौघांना 8 जानेवारीला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून महिंद्रा एसयूव्ही या कारसह गावठी पिस्तुले व दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

शिरपूर तालुका पोलिसांना पळासनेर घाटात संशयित व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पळासनेर घाटातील भिलटदेव मंदिरापुढे महिंद्रा एसयूव्ही (आरजे 45, यूए 5007) उभी असून तिच्यातील प्रवासी संशयास्पद हालचाली करतांना आढळले.पोलिसांना पाहून संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला.पाठलाग करून पोलिसांनी संशयित महावीरसिंह विजयसिंह रावत (वय 19, रा. राजवा ता. भिम जि. राजेसमन, राजस्थान),
महिंदर मोहनलाल जाट (वय 28,रा.खाऱ्या ता.सोजद जि. पाली, राजस्थान,ह.मु. हुबळी,कर्नाटक), विनोदकुमार सुजाराम जाट (वय 30, वर्षे रा.राजस्थान, ह.मु हुबळी, कर्नाटक) हेमेंदरसिंह सैतानसिंग (वय 22, रा. भिलोका बाडीया जि. अजमेर,राजस्थान) यांना ताब्यात घेतले. अन्य संशयित दिवाराम शंकरलाल जाट व रामसिंह बाटी (दोघे रा.राजस्थान) फरारी झाले. संशयितांकडून वाहनासह दोन गावठी कट्टे,तीन जिवंत काडतुसे, चाकू, लोखंडी पहार, मिरची पूड,कटर, दोरखंड आदी नऊ लाख नऊ हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार,
उपनिरीक्षक कृष्णा पाटील,सहायक उपनिरीक्षक रफिक मुल्ला,हवालदार जयराज शिंदे,शेखर बागुल,संदीप ठाकरे, दिनेश सोनवणे,बाला पुरोहित, मुकेश पावरा,ग्यानसिंह पावरा,दिनकर पवार,मनोज नेरकर,भूषण पाटील, मनोज पाटील यांनी ही कामगिरी बजावली.पुढील तपास उपनिरीक्षक कृष्ण पाटील हे करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध