Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

धुळ्यात परीट (धोबी) समाजाच्या पूर्ववत, आरक्षण लढ्याला नवी दिशा देण्याचा संकल्प...



धुळे प्रतिनिधी :-  धुळे  राज्यातील परीट (धोबी) समाज नव्याने आरक्षण मागत नसल्याने समाजाला अनुसूचित जातीच्या यादीतून बेकायदा काढून टाकल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात जाऊन पुनःश्च समावेश करण्यासाठी न्याय मागण्याची नवीन लढाई उभारावी, असा सर्वसमावेशक संकल्प परीट (धोबी) समाजाच्या बैठकीत करण्यात आला. परीट समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे म्हणून दि. १८ फेब्रुवारी रोजी धुळे येथे संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ सभागृहात सर्व संघटनांची संयुक्त उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. प्रारंभी संत गाडगेबाबा पुतळ्याचे पूजन उपस्थितांच्या हस्ते झाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे हे होते. समाजाचे ज्येष्ठ उद्योजक राजेंद्रशेठ आहेर (नाशिक), समाजाच्या आरक्षण फाईलचे अभ्यासक अनिल शिंदे (अकोला), प्रदेश उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, माजी प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे (जळगाव), सरचिटणीस राजाभाऊ उंबरकर (अमरावती), माजी कार्याध्यक्ष ईश्वर मोरे, प्रा. सदाशिव ठाकरे यांनी पूर्ववत आरक्षण कसे मिळेल यावर आपापली मते मांडली. यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूराव जाधव यांना समाजासाठी केलेल्या कार्याची दखल म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देत गौरव करण्यात आला. बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून धुळे मनपाचे माजी सभापती सोनल शिंदे, परीट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी सौ. रत्नाताई शिंदे, डॉ. अरुण पेढेकर, डॉ. रजनीताई लुंगसे, डॉ. उषाताई फाले, गणेश मढीकर, सुरेश ठाकरे, धुळे जिल्हाध्यक्ष अमृत कुवर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष रमेश मोरे, जे. डी. ठाकरे, सौ. राधाताई आहेर, अशोक सपके, सुभाष टाले, प्रा. रमेश सांबस्कर, असलम शेख, सचिन शहाकर, अक्षय चहाकार, कृष्णा शिंदे, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. कल्याणी कच्छवाह यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप गवळी, संजय गवळी, भोला सगरे, दिलीप हजारे, सौ. रेखाताई गवळी, कैलास मांडोळे, अनिल बोरसे, महेंद्र सूर्यवंशी, सौ. कल्पनाताई निकम, सौ. गायत्रीताई सगरे, भिका निकम, सौ. लताताई शिरसाठ, प्रवीण शिंदे आदिंनी परिश्रम घेतले.


चौकट :............................................................

परीट (धोबी) समाजाच्या पूर्ववत आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी न्यायालयीन लढ्याची समिती स्थापन होण्यासाठी समाजाच्या सर्व संघटनाची सर्वसमावेश बैठक येत्या 3 मार्च रोजी नाशिक येथे

आयोजित करण्याचे ठरले.

......................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध