Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

थाळनेर येथे दुपारी घरफोडी लाखों रुपयांचा ऐवज लंपास...!



         
थाळनेर (वार्ताहर):- शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील दामशेर पाडा येथे आज दीं.१६ रोजी भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास अज्ञात दोन इसमांनी बंद घर बघून घराचा दरवाजाच्या कडी कोंडा तोडून घरातून लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
       
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विठ्ठल लोटन पाटील हे दुपारी बारा वाजेच्या सुमारास गुरांना पाणी पाजण्यासाठी गेले होते व घरातील महिला गल्लीत गेल्या होत्या याची संधी साधून अज्ञात दोन भुरट्या चोरांनी बंद घराचा कडी कोंडा कटरच्या साह्याने तोडून घरात आत प्रवेश केलेला होता.त्यानंतर काही वेळातच विठ्ठल पाटील यांची नात कणक वय (९) ही शाळा परत घरी आली होती. त्यावेळेस तिला घराचा दरवाज्याचे कडी कोंडा तोडून त्याच ठिकाणी पडलेला दिसल्याने तिने घरात प्रवेश केला.घरात दोन अनोळखी अज्ञात इसम दिसल्याने तिने चोर - चोर अशी आरोळी मारली. त्या अनोळखी व्यक्ती पैकी एकाने तिचा गळा दाबून धरला तर दुसऱ्याने कटरच्या साहाय्याने घरातील गोदरेज कपाट तोडले व त्यातुन सोने चांदीचे एकूण ९३००० हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी काढून मुलीला जोरात ढकलून पळ काढला. पाणी पाजून बाबा घरी आल्यावर कणकने बाबांना सर्व परिस्थिती सांगितली.भर दिवसा घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
            
सायंकाळी धुळ्याहून फिंगरप्रिंट घेणारे पथक आले होते.याबाबत थाळनेर पोलीस ठाण्यात गु.र.न.३८/२०२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध