Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

सातपुड्याच्या दुर्गम भागात मशरुम उत्पादनाचा प्रयोग यशस्वी,या माध्यमातून उच्चशिक्षित तरुण डाॅ.रविद्र पावराने साधली आर्थिक प्रगती.




शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील दुर्गम क्षेत्रात असणाऱ्या सटिपाणी गावातील उच्च शिक्षित तरुण डाॅ.रविंद्र रमेश पावरा यांनी मशरुम उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. उच्च शिक्षण घेऊन नोकरी करता करता या तरुणांनी मशरूम उत्पादनातून आर्थिक प्रगती साधली आहे. शिरपुर तालुक्यातील सटीपाणी गावात मशरुम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. डाॅ.रविद्र पावरा यांनी एमबीबीएस चे शिक्षण घेतले असुन तोरणमाळ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत आहे. 

डाॅ रविद्र पावरा यांच्या घरी वडिलांची अल्पभुधारक कोरडवाहु जमीन आहे. पारंपारिक पिकांच्या माध्यमातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कुटुंब हतबल झाले होते.अशातस धडगाव या ठिकाणी मशरुम व्यवसाय प्रशिक्षणाला उपस्तित राहील्याने त्यांनाही मशरुन बाबत कुतुहुल वाटले व आपल्या परीसरात देखिल याचा प्रयोग करण्याचे निश्चित केले. मशरुम शेती मार्गदर्श श्रीराजेंद्र वसावे व लिलाताई वसावे यांचे अनमोल मार्गदर्शनातुन डाॅ.रविंद्र पावरा या तरुणाने दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग करत आर्थिक प्रगती साधलीय. थंड प्रदेशात येणारे मशरुम आता सटीपाणी या दुर्गम क्षेत्रातील दुष्काळी पट्ट्यात आले आहे.

कमी खर्चात मशरुम उत्पादनासाठी शेडची निर्मिती वडिलांच्या गावात असणाऱ्या शेतीत कायम पारंपरिक पीक घेऊन वर्षाकाठी हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळं शेतीत नवीन काही तरी करायचे यांनी ठरवले.
त्यानंतर  मशरुम घेण्याचा निर्णय केला. त्याबाबत प्रशिक्षण घेऊन आपल्या राहत्या घरातील एका कोपर्‍यातच  शेड उभारले. त्याला आतून आणि बाहेरून ग्रीन मॅट लावली. शिवाय आतून बारदाण्याचे अच्छादनही दिले. बाबूंचे टेबल तयार केले असा हा कमी खर्चात त्यांनी मशरुम उत्पादन करण्यासाठी आसपास उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून शेड उभारले.नेमकं मशरूम उत्पादन होते कसे ? गव्हाचा किंवा सोयाबीनचा भुस्सा घेऊन ते पाण्यात मिक्स करून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. भिजलेला भुसा बाहेर काढून मोकळा करायचा. त्यात 60 टक्के आद्रता झाल्यास त्या भुस्यामध्ये (spawn) मशरुम बीज टाकून पॉलिथिनमध्ये भरुन घ्यायचे. त्यानंतर ते बेड एका हवा बंद रुममध्ये ठेवायचे. ज्या रुमचे तापमान 20 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस आणि आद्रता 60 टक्के ते 70 टक्के असावी. 15 दिवसानंतर ते बेड पांढरे शुभ्र पडल्यावर मोकळे करुन ठेवायचे. बेड मोकळे केल्यावर त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी मारायचे. 25 दिवसानंतर त्यावर मशरूम यायला सुरुवात होते. मशरूम पीक हे साधारण 45 दिवसाचं असते.खर्च जाऊन दीड महिन्यात निव्वळ नफा मशरुम हे पंच्चेचाळीस दिवसांचे पीक आहे. या कालावधीमध्ये तीन वेळा याची काढणी करता येते. ज्यात पहिल्यांदा 25 व्या दिवशी त्यानंतर 35 व्या आणि शेवटची काढणी ही 45 व्या दिवशी घेतली जाते. हे मशरुम काढल्यानंतर याचे पॅकेजिंग 1 किलो अश्या मागणीप्रमाणं केली जाते. ज्याला तीनशे रुपये प्रति किलो दर त्यांनी निश्चित केला आहे. सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटची काढणी करेपर्यंत सर्व मिळून उत्पादन खर्च हा सहा हजारांपर्यंत येतो. याचे उत्पन्न हे तीस हजारांच्या आसपास होते. सगळा खर्च जाऊन या तरुणांना 45 दिवस म्हणजे दीड महिन्यात जवळपास पंच्चवीस ते तीस हजारांचा फायदा होतो..
 
बाजारपेठ मिळण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर कुठल्याही उत्पादनाला बाजारपेठ मिळणे गरजेचे असते. या तरुणांनी हेच लक्षात घेऊन बाजारपेठ मिळण्यासाठी सोशल मीडि सातपुड्याच्या दुर्गम भागात मशरुमचा यशस्वी प्रयोग, उच्चशिक्षित तरुणांनी साधली आर्थिक प्रगती   याचा अतिशय योग्य प्रकारे वापर केला. ज्यामध्ये त्यांना यश आले. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप आणि इंस्टाग्राम यावर हे तरुण मशरुमच्या उत्पादन आणि विक्रीबाबत नियमित पोस्ट करतात. त्यावर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मोठ्या हाॅटेल व्यावसायीकांना मशरुमची विक्री करण्याचा मानस
सध्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या तरुणांनी मशरुम उत्पादन घेतले आहे. त्यातच योग्य मार्केटिंग आणि मिळत असलेला दर पाहता येणाऱ्या काळात मशरुम उत्पादन हे केवळ नागरिकांना नाही तर मोठ्या हाॅटेल व्यावसायीकांना मशरुमची विक्री करण्याचा मानस आहे. त्याच दृष्टीने त्यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करुन नाविन्यपुर्ण मशरुमचे उत्पादन घेतले आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी निश्चित आशादायी आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध