Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

डिजेपेक्षा पारंपरिक वाद्यासह व्याख्याने आयोजित करीत शिवजयंती साजरा करावी, शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन...!



शिरपूर प्रतिनिधी:-13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास शिवजयंती व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पोलीस पाटील व शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि शांतता कमिटी  पदाधिकाऱ्यांची शहर पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली.
          
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले.उत्सव साजरा करतांना आयोजकांकडून डीजे लावण्यात येतो मात्र डीजेमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास याचा विचार करून आयोजकांनी पारंपरिक वाद्याचा विचार करून होणाऱ्या बचतीतून शिव व्याख्याने आयोजित करून युवक व समाजाचे प्रबोधन करावे असे आवाहन करीत मार्गदर्शन केले.शांतता कमिटीचे 40 वर्षापासूनचे सदस्य माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्या निधन नुकतेच झाले असून त्यांना श्रद्धांजली म्हणून शहरातील शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणूक न काढता जागीच पूजन,माल्यार्पण करीत साध्या पद्धतीने आयोजन करण्यात आल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली.

याप्रसंगी संजय पाटील,हेमंत पाटील,
भरत राजपूत राजू टेलर,इरफान मिर्झा यांनी  काही सूचना केल्या तर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी मार्गदर्शन करीत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.बैठकीत नगरसेवक प्रशासकीय अधिकारी हासवाणी वीज वितरणचे अभियंता सुधीर बोरसे,
शांतता कमिटीचे सदस्य, राजकिय पदाधिकारी, पोलीस पाटील, व शहर व तालुक्यातील शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध