Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

शिंदखेडा महाविद्यालयात शिवजयंती निमित्त शिवचरित्र व्याख्यान, मधुदीप पुरस्कार वितरण सोहळा, व वार्षिक पारितोषिक उत्साहात संपन्न...!



शिंदखेडा प्रतिनिधी :- शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. शंकर देवचंद पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य वाणिज्य आणि  कै.भाऊसाहेब मधुकर दिपचंद सिसोदे विज्ञान महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रथम महाविद्यालयात आनंद बाजाराचे उद्घाटन महाविद्यालयाचे स्थानिक कार्यकारिणीचे सदस्य  मा. भाऊसाहेब सुरेशजी देसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 
शिव व्याख्यानाची सुरुवात फुल झाडांना जल अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री  डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख, शुभमजी गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे, मुकेशजी ठाकूर कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग धुळे, तसेच शिवव्याख्याते  शिवश्री डॉ. श्रीमंत कोकाटे साहेब, महाविद्यालयाचे अध्यक्ष  बापूसाहेब प्रफुल्ल कुमारजी  सिसोदे, उपाध्यक्ष बापूसाहेब अशोकजी पाटील, स्थानिक कार्यकारणीचे सदस्य  भाऊसाहेब सुरेशजी देसले,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. पवार, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे उपप्राचार्य डॉ. विशाल पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  एस. टी. राऊळ, कार्यालयीन अधिक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.
 
उद्घाटनानंतर  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस पवार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वर्षभरात महाविद्यालयात घेतलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.तसेच  महाविद्यालयाची उत्तरोत्तर होत जाणारी प्रगतीचा आलेख मांडला.वार्षिक पारितोषिक वितरणात कनिष्ठ महाविद्यालय गुणवत्ता यादीतील  18 विद्यार्थी वरिष्ठ महाविद्यालय  28 विद्यार्थी तसेच  5 प्राध्यापकांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात ही कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत विविध क्रीडा प्रकारात  21 खेळाडूंची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यापीठाच्या संघात चार खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. त्यांचाही सत्कार करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे आंतरशालेय विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत एकूण तीन खेळाडूंची निवड झाली. राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत एक खेळाडूला सुवर्णपदक प्राप्त झाले. मान्यवरांच्या हस्ते सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले.

मा. बापूसाहेब प्रफुल्लकुमारजी सिसोदे यांनी आपल्या मनोगतात डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख  यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.कै.भाऊसाहेब मधुकर दिपचंद  सिसोदे यांनी आपल्या सामाजिक, राजकीय,व शैक्षणिक क्षेत्रात तपोभूमी मानून त्यांनी वाटचाल केली. त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून व त्यांचा कार्याचा गौरव म्हणून "मधुदीप " 2024 चा पुरस्कार सन्माननीय  डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख  यांना  मानपत्र देऊन  अत्यंत उत्साहात  देण्यात आला.
 
अकरावीच्या विद्यार्थिनी रुचिता पवार, उर्मिला गिरासे  यांनी शिवगर्जना केली . शिव व्याख्यानात शिवश्री  डॉ. श्रीमंत कोकाटे  यांनी लोककल्याणकारी राजे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे  विविध पैलू उलगडून दाखवले.अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत  छत्रपती शिवराय म्हणजे धर्मनिरपेक्ष, सर्व समावेशक , स्त्रियांचा सन्मान,उत्तम प्रशासक , अर्थव्यवस्थापन,पर्यावरण व्यवस्थापन, जल व्यवस्थापन,सतत नव्या गोष्टी शिकण्याची तयारी,अशा अनेक पैलूंनी राजे दूरदृष्टीचे होते. सरांनी आपल्या अमोघवाणीने  शिव प्रेमींना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. अश्विनी भामरे , प्रा.डॉ.ए.डी.कांबळे, प्रा. स्वप्निल गांगुर्डे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे  यांनी केले.कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ.विशाल पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध