Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

कोपरी मराठा समाज वतीने शिवजयंती उत्साहात साजरी...!



ठाणे (विश्वनाथ पंडित) बँड पथकाचे सुरसंगीत, छत्रपतींच्या नावाच्या गगनभेदी गर्जनानी प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात, तितक्यात अभूतपूर्व उपस्थितीत कोपरी मराठा समाज, ठाणे या संस्थेच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमेची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी शिवप्रेमी बांधवांची, माता-भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.अष्टविनायक चौक येथून उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झालेली मिरवणूक ठाणे पूर्व विभागात काढण्यात आली. भगवेमय झालेले वातावरण, लोकांचा सहभाग आणि कोपरी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे शिस्तबद्ध परिश्रमातून मिरवणूक प्रचंड उत्साहात पार पडली. ‌



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध