Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

भोई समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाकडे पत्राव्दारे राधेश्याम भोई यांची मागणी...!



शिरपूर : ( प्रतिनिधी ) गेल्या दहा वर्षांपासून आपल्या समर्थ नेतृत्वात देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. खऱ्या अर्थाने समाजाच्या सर्व गटातील लोकांना न्याय देण्याचे कार्य आपण करीत आहात याचा पक्ष कार्यकर्ता म्हणून मला मोठे समाधान असून याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन !  देशात विविध राज्यात भोई समाज पारंपरिक व्यवसाय करून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. परंतु या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही याची खंत आहे. 

तरी भोई समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाकडे पत्राव्दारे शिरपूर भाजपा शहर चिटणीस व भोई समाज शिरपूर युवा शहर उपाध्यक्ष राधेश्याम भोई यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आमच्या भोई समाजाला आजपावेतो कोणत्याही राजकीय पक्षाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यात उमेदवारी देवुन सामाजिक पातळीवर प्राधान्य दिलेले नाही हे मुद्दाम आपल्या लक्षात आणून देवू इच्छितो. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात पाठवलेल्या पत्राव्दारे शिरपूर भाजपा शहर चिटणीस राधेश्याम भोई यांनी म्हटले आहे. निवेदनाची प्रत खा. जे.पी.नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप, आ.चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजप महाराष्ट्र, ना.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांना ही पाठवल्या आहेत. पुढे नमुद केले आहे की, आपण सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे ही बाब समाधानाची आहे. भोई समाजाचा विचार देखील केला जावा यासाठी हा पत्र लेखनाचा माझा प्रयत्न आहे. अनेक वर्षे झाली भोई समाज पारंपरिक व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहे. मात्र देश व समाज यांचे आपण काही देणे लागतो ही भावना समाजाची आहे. आपल्या नेतृवात समाजाला देशाच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. भाजप बरोबर आमचा समाज आहे. अनेक बांधव पक्षाचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडीत असून त्यातून उपेक्षित घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यासाठी खऱ्या अर्थाने राजकीय प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. तसे झाले तर समाजकारणाचा घेतलेला वसा पुढे घेवून जाणे शक्य होईल अशी आमची खात्री आहे. तरी येत्या लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद निवडणुकीत देश पातळीवर आणि राज्य निहाय होणाऱ्या निवडणुकीत भोई समाजाला उमेदवारी देवून प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, ही संधी मिळाली तर आपल्या समर्थ नेतृत्वात विकास करण्याची जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्यास न्याय मिळेल. मला अशा आहे की, भोई समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळणे संदर्भातील मागणीचा आपण निश्चित विचार कराल आणि योग्य संधी द्याल. आजवर केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल आपले पुन्हा एकदा अभिनंदन !! आणि पुन्हा ही संधी देशाची जनता आपणास देणार आहे त्यासाठी मनापासून शुभेच्छा ! असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात पाठवलेल्या पत्राव्दारे शिरपूर भाजपा शहर चिटणीस राधेश्याम भोई यांनी म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध