Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

पारिजात विद्यालय मनसगाव येथे पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न....! राजेश राजोरे देशोन्नती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित...!



शेगाव प्रतिनिधी.:( उमेश राजगुरे)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगाव तालुका च्या वतीने दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी पारिजात पारिजात विद्यालय मनसगाव येथे पत्रकार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम मान्यवरांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर तानुबाई बिर्जे व थोर महापुरुषांच्या फोटोचे दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण केले
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेसंजीत दादा पाटील हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक राजेशजी राजोरे साहेब हे होते तर प्रमुखउपस्थितीमध्ये अभिमन्यू भगत केंद्रीय सदस्य बाबाराव खडसे केंद्रीय कार्यालय प्रमुख ,अनुप गवळी जिल्हाध्यक्ष, अश्विन राजपूत जिल्हा संघटक,रामेश्वर गायकी जिल्हा कार्याध्यक्ष, अमोल भगत जिल्हा संपर्कप्रमुख ,सचिन ढोके जिल्हा कार्याध्यक्ष अमरावती, राहुल कविटकर जिल्हा संपर्कप्रमुख अमरावती ,अंकुश राठोड संपादक सेवाशक्ती टाइम, नंदाताई पाऊलझगडे, सविताताई झाडोकार, सुषमाताई शेगोकार ,प्रीतीताई शेगोकार, ठाणेदार दिलीप वडगावकर, नितीन भाऊ शेगोकार ,भारतभाऊ कंकाळ, श्री एस एस खुणे सर, राजू पाटील शेळके पत्रकार रमाकांत मोरे बऱ्हाणपूर, अनिल उंबरकार राजेश चौधरी देवानंद उमाळे अमर बोरसे दिनेश महाजन ज्ञानेश्वर ताकोते,मनोज बागडे ,आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात संत भूमीचे सुपुत्र आम्हा पत्रकारांचे मार्गदर्शक दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा आवृत्ती संपादक राजेश राजोरे साहेब यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपिठावर आणि उपस्थितांमध्ये अतिशय आनंदाचे व गौरवपूर्ण वातावरण होते तसेच सचिन कडुकार यांना शोध पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला तसेच पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रामधील उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले यामध्ये ज्येष्ठ पत्रकार केशव घाटे ,ज्येष्ठ पत्रकार देवानंद उमाळे ,ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, शैक्षणिक क्षेत्रात नंदलाल उन्हाळे सर,सामाजिक क्षेत्रात रंजन तेलंग आरपीएफ ,यशवंत राखोंडे ,नीता खुरपडे ,प्रवीण गवई ,नितीन भाऊ शेगोकार , गजानन सरकटे ,महेंद्र सावंग, आतिश सुरवाडे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर दिनेश खेताडे ,उमेश शिरसाट रुग्णसेवक, गजानन कडूकार रुग्णसेवक तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील प्रिया राजवैद्य व वैष्णवी दाणे या दोन मुलींना नंद फाउंडेशन अकॅडमी शेगाव यांनी दत्तक घेऊन आज रोजी ह्या मुली वैद्यकीय क्षेत्राकडे गेल्या त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच पारिजात विद्यालय मनसगाव येथील nms उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला रोहित मोरडे सर अकोला यांचा कला संच देशभक्ती महापुरुषांची गीते मराठी हिंदी सिने गीते यांचां मनोरंजनाचा कार्यक्रम झाला सदर कार्यक्रमाच्या आयोजनाला तालुकाध्यक्ष देवचंद्र समदूर ,कोषाध्यक्ष सागर शिरसाट, उपाध्यक्ष गौतम इंगळे, शहराध्यक्ष उमेश राजगुरे ,श्रीकांत कलोरे ,दिनेश घाटोळ ,ऋषिकेश देठे, अक्षय साळदेकर, व सर्व टीमने परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश भाऊ शिरसाट यांनी केले  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भगत सर व प्रशांत देशमुख सर यांनी केले तर आभार देवचंद्र समदुर यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध