Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

शिंदखेडा महाविद्यालयात रामानुजन जयंती साजरी...!



शिंदखेडा:- येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ,
गणित विभागा मार्फत राष्ट्रीय गणित दिवस तथा भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली.

कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.टी. राऊळ यांच्या हस्ते रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यलयीन अधिक्षक श्री.राहुलपाटील ,गणित विभागप्रमुख प्रा. जितेंद्र पाटील ,प्रा.राकेश
देवरे,प्रा.पंकज भदाणे ,
प्रा.हरिष बच्छाव,प्रा.प्रधान महाले,प्रा.एम.एच.पाटील,
प्रा.सौ.वंदना पाटील, प्रा.सौ.डिंपल अहिरराव उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

 त्याप्रसंगी गणित विभाग प्रमुख प्रा .जितेंद्र पाटील यांनी भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या बद्दल माहिती दिली.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा.तुषार करंके,
प्रा.मुकेश पाटील,प्रा.संजय बोरसे,श्री.पंकज चव्हाण,प्रा.अरुण पाटील,श्री.अनिल पाटील श्री.संदीप पवार,श्री.भटू देसले,श्री.सुधाकर बोरसे,श्री.पंकज साळुंखे यांनी परिश्रम घेतले





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध