Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

साक्री तालुक्यातील मलाजन येथे शिवतीर्थ स्मारकाचे आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले



साक्री तालुक्यातील मौजे मलांजन येथे नवीन शिवस्मारक स्थापन करून त्याचे उद्घाटन सोहळा आपल्या साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ मंजुळाताई तुळशीराम गावित यांच्या शुभ हस्ते करण्यात आले 19 फेब्रुवारी 2024 या पवित्र दिवशी म्हणजेच शिवजयंती च्या निमित्ताने या पवित्र स्मारकाचे उद्घाटन आमदार मंजुळा गावित व धुळे जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल देसले व भाडणे गावचे लोकनियुक्त सरपंच साईभक्त अजय सोनवणे,साक्री पंचायत समिती सदस्य पंकज भामरे,देगावचे विनायक तात्या अकलाडे,पंचायत समिती उपसभापती मंगला देसले, आमदारांचे सहाय्यक मोतीलाल पवार,राजेंद्र नांद्रे सर आधी उपस्थित होते कार्यक्रमात आलेल्या सर्व पाहुण्यांचा मलांजन गावच्या ज्येष्ठ नागरिकांकडून सत्कार व सन्मान ही करण्यात आला तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. भैया दादा सोनवणे यांनी केले तसेच या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण शिवचरित्रावर व्याख्यान करणारे प्राथमिक शिक्षक मोहिते सर यांनी शिवचरित्रावर व्याख्यान   माला सादर केली यावेळी गावातील आबाल वृद्धांसह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमात पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच देखील उपस्थित होते आमदार मंजुळा गावित यांनी या कार्यक्रमात बोलताना केलेल्या विकास कामांचा उल्लेख हि केला तसेच मलांजन ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी परीक्षित सोनवणे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले ते बोलताना म्हणाले की येणाऱ्या काळात आमचे मलाजन गाव मंजुळा ताई सोबत आहोत अशी ग्वाही देतो व आजही अनेक विकास कामे ही प्रगतीपथावर आहेत आणि येणाऱ्या काळात अजूनही काही कामे होण्याचा संकल्प आमचा आहे असे प्रतिपादन सरपंच प्रतिनिधी परीक्षित सोनवणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध