Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

भारतीय जनता पार्टी शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी के. डी.पाटील यांची नियुक्ती...!



शिरपूर प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी के. डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार, कांतीलाल दगा पाटील (के.डी.पाटील) यांची भारतीय जनता पार्टी शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा यांच्या शिफारशी नुसार त्यांची निवड करण्यात केली.

त्यांच्या नियुक्ती बद्दल माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. तुषार रंधे, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तरसिंग पावरा, विविध संस्थांचे पदाधिकारी, अनेक मान्यवर तसेच शिरपूर शहर व तालुक्यातील, जिल्ह्यातील नागरिक, हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.

के. डी. पाटील हे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती असून धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच विविध पदांवर यशस्वीपणे कामकाज सांभाळले आहे. तसेच ते आमदार अमरिशभाई पटेल यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध