Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

नवागांव (बुडकी) येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा....!


  
शिरपुर : तालुक्यातील नवागांव येथे विश्व मंडळ सेवाश्रम शिरपुर व लोकमंच शिरपुर यांच्या संयुक्त विद्यमाने नवागांव (बुडकी) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे....
   
8 मार्च रोजी संपुर्ण भारतात महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत त्याच्या अनुषंगाने आज दि :24/2/2024 रोजी नवागांव (बुडकी) येथे महिला मेळावा संपन्न,सर्व प्रथम : आलेल्या पाहुण्यांचे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गित म्हणत स्वागत करण्यात आले....
   
त्या नंतर प्रमुखांच्या उपस्थित सावित्रीबाई फुले, व देवमोगरा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रोजन करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली, प्रस्तावना राजेश पावरा सर यांनी केली, तर आरोग्य विषयावर सिमा पावरा (भोईटी) यांनी मार्गदर्शन व माहिती दिली, तसेच स्त्री - पुरुष संमातर विषयावर मुक्ता पावरा (प्रिंपडीपाडा) यांनी महिला ना स्त्री - पुरुष मधील जो मतभेद काय असते हे सविस्तर माहिती दिली...
    
महिला दिनाच्या मुद्दा वरून ग्रामपंचायत तसेच विविध शासकीय कामात महिला वर्ग ना विशेष स्थान देण्यात येत व या विषयावर शब्बीर पावरा (पं.स.अमेद सदस्य) यांनी महिलांना मार्गदर्शन व बचत गटाच्या फायदे व मार्गदर्शन विशेष प्रमाणे देण्यात आले....
    
नंतर कार्यक्रमात महिलांना विविध खेळ खेळवत बक्षीस वितरण करण्यात आले व शेवटी आदिवासी परपरेनुसार आदिवासी गाण्यावर नृत्य करत आंनद व्यक्त करण्यात आला व शेवटी स्नेहभोजनाचा देखील आंनद घेत कार्यक्रमाची संपन्न करण्यात आली...
   
आभार प्रदर्शन बन्सीलाल पावरा सर व जितेंद्र पावरा यांनी केले.. 
 या वेळी : बिन्सी, बिवीयन सि.कॅलसिन, रोमालिया, शब्बीर पावरा (उमदे सदस्य),अँड.भाईदास पावरा (लोकमंच सदस्य) शामलाल पावरा (लोकमंच सदस्य), राजेश पावरा (लोकमंच सदस्य) लक्ष्मण पावरा (पो.पाटील), खंडु पावरा, जितेंद्र पावरा, उदेसिंग पावरा, प्रकाश पावरा, तसेच वाहल्यापाणी, नवागांव, मांजरबड्डी, सजगारपाडा, लालसिंग पाडा गावीत महिला व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते....



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध