Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

भोई गौरवने शेतकऱ्यापासून तर सैनिकापर्यंत पुरस्कार देऊन केला सन्मान..!



नागपुर प्रतिनिधी : भोई गौरव मासिकाचा पाचवा वर्धापन दिन समारंभ रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 ला शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात नागपूर येथे लोकांच्या भरगच्च उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला. या समारंभात जवळपास 100 लोकांना भोई गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या समारंभाला चांद्यापासून तर बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकं मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून अकोला येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री रमेश वानखेडे यांनी केले तर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक श्री प्रकाश नंदाने अकोला हे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. राजेश डहारे शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर, श्रीमती अश्विनी भोई फलटण जिल्हा सातारा, सौ. कल्पना कारळे पुणे, मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे, सहसंपादक डॉ. श्रीकृष्ण ढाले, डॉ. वर्षा गंगणे, सौ. चित्रा मेश्रे, श्री.राजाराम म्हात्रे, प्रा. राहुल गौर, श्री गजानन गाळवेकर, डॉ. बळवंत भोयर, तसेच उकंडराव सोनोने, श्री मनोहर पचारे, श्री. रामकृष्ण बागडे, निषाद पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कैलास केवदे, श्री अभिमानजी सूरजुसे, श्री संजय पारिसे, श्री टेकचंद शहारे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते, ५ वर्षाच्या कार्याचा अहवाल कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दाखवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीत व सरस्वती स्तवन श्री. संजय पारिसे वर्धा यांनी सादर केले.

 प्रस्तावित मुख्य संपादक श्री चंद्रकांत लोणारे यांनी केले तर याप्रसंगी रमेश वानखेडे, श्री प्रकाश नंदाने, डॉ. राजेश डहारे, श्रीमती अश्विनी भोई, कल्पना कारळे, श्री गुलाब सोनवणे, श्री दत्ता टोकलवाड, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात सर्वांनी भोई गौरव च्या या स्तुत्य उपक्रमाचे तोंड भरून कौतुकही केले. या कार्यक्रमाला जळगाव, धुळे, नाशिक, नांदेड, रायगड, मुंबई, पनवेल, चंद्रपूर, गडचिरोली, भद्रावती सिंधुदुर्ग, नेपाल, काश्मीर, दिल्ली. यवतमाळ, वर्धा, अमरावती, सातारा, सांगली, कोहलापुर, पुणे, लाखांदूर, भंडारा, गोंदिया, अकोला, नागपूर, नागपूर जिल्हा, इत्यादी ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या समारंभात तीन भारतीय सैनिक श्री संदीप नागपुरे, श्री संतोष तायडे, व श्री मनोज मॉर्से तसेच संत्रा उत्पादक शेतकरी सूर्यभान वराडे अमरावती व भवानी मंदिर पारडी येथे पुजारी म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप सतीमेश्राम या पुजाऱ्याचाही सत्कार करण्यात आला. तसेच पाच वर्ष यशस्वी मासिक चालवल्याबद्दल भोई गौरव प्रतिनिधींच्या वतीने मुख्य संपादकाचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजाराम म्हात्रे, प्रा. राहुल गोर, व डॉ. बळवंत यांनी केले. आभार श्री गजानन गाळवेकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सुशीला लोणारे, मृणाल लोणारे, वृषाली लोणारे, अमन भांडारकर, वैभव घोडे, गजानन गाळवेकर, राहुल गौर, चित्रा मेश्रे, किशोर ढाले, दिनेश आमझरे, रवींद्र परीसे, दिलीप मांढरे, मथुरा सुरजुसे, इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. स्व.अनंतराव बावणे राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा पुरस्कार, सामाजिक, साहित्यिक, कला, शिक्षण, राजकारण, भारतीय सैनिक, कृषी विभाग, क्रीडा विभाग, उद्योजक व्यापारी, स्त्री शक्ती पुरस्कार, चित्रपट क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, मत्स्यसहकार क्षेत्र, उच्चपदस्थ अधिकारी, संगीत व गायन क्षेत्र, पत्रकारिता, उत्कृष्ट भोई गौरव प्रतिनिधी, प्रायोजक, सूत्रसंचालक तसेच विशेष पुरस्कार भोई समाज पंच कमिटी नागपूर 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या समितीच्या सदस्यांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. निशाद पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.या कार्यक्रमात भोई गौरवच्या वर्धापन विशेष अंकाचे प्रकाशन तसेच डॉ. वर्षा गंगणे व माणिक गेडाम व कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. हे विशेष. राष्ट्रगीता नंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध