Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

सुप्रसिध्द मराठी साहित्यिक योगेश मोरे यांनी विद्यार्थांना केले मार्गदर्शन...!



छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील सुप्रसिध्द मराठी साहित्यिक,गीतकार, संगीतकार,
कथा,लेखक तथा पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्यसचिव योगेश तुळशीराम मोरे यांना ज्योती मंदिर विद्यालय,हर्सूल टी पॉइंट छत्रपती संभाजीनगर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.तसेच मराठी साहित्यिक "योगेश मोरे"
विद्यार्थांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शाळेच्या अभ्यासाबरोबरच स्वतः मधील कला गुणांना आत्मसात करून नक्कीच स्वत:च्या प्रगतीकडे वाटचाल करून आपल्या भारत देशाचं नाव लौकिक करावं! असे प्रतिपादन योगेश मोरे यांनी मार्गदर्शनप्रसंगी केले.



तसेच योगेश मोरे यांची स्वलिखित "भरकटलेल्या पक्ष्याचा किलबिलाट" कादंबरीच्या प्रमुख प्रती शाळेस भेट म्हणून दिल्या.तसेच शाळेच्या माजी विद्यार्थिनी अलकनंदा नाथाजी नांदे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाप्रसंगी डॉ.विनोद सिनकर सरस्वती भुवन हायस्कूल, ॲडव्होकेट सुधीर कुलकर्णी, मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा चव्हाण, श्रीमती स्मिता शिवणीकर,श्रीमती कांचन सवडतकर,श्रीमती अनुराधा भगत,श्रीमती विद्या भगत,श्रीमती ईश्वरी सोनटकर,श्रीमती सविता पाटील,
श्रीमती स्वाती बागुल,शोभा पांडे,ज्योती तायडे आदी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा चव्हाण यांनी मोरे यांच्या अमेझॉनवरील इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेल्या द श्रील चर्प ऑफ अ लॉस्ट बर्ड या कादंबरीचे भरभरून  कौतुक केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध