Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय व दादासो व्ही व्ही रंधे प्रायमरी स्कूल वाघाडी(सुभाष नगर) येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.



शिरपूर प्रतिनिधी:- आज दिनांक 17/02/2024 रोजी ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय व दादासो व्ही व्ही रंधे प्रायमरी स्कूल वाघाडी (सुभाष नगर )ता. शिरपूर जि.धुळे येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी 
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव मा. नानासो निशांतजी रंधे यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेच्या विश्वस्त ताईसो सीमाताई रंधे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बापूसो विनायकराव देवरे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे व्यवस्थापक बापूसो के डी बच्छाव, वाघाडी गावचे सरपंच नानासो किशोर माळी, सुभाष नगरचे सरपंच भाऊसो विजय पवार, वाघाडीचे उपसरपंच भाऊसो जगदीश कोळी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासो अनिल सुतार, वाघाडी गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अण्णासो श्रीराम माळी, माजी उपमुख्याध्यापक आबासो एस पी बोरसे , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भाऊसो पूनमचंद भाऊ मोरे, माजी उपसरपंच भाऊसो छोटू बाविस्कर ,इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोठारी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वर्गात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच वर्षभरातील इतर स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  यावेळी नानासो किशोर माळी बापूसो विनायकराव देवरे, भाऊसो विजय पवार यांनी आपल्या भाषणातून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानासो निशांतजी रंधे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज साधले व विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता विकास कसा होईल यासाठी सदैव आमचा किसान विद्या प्रसारक संस्था परिवार प्रयत्नशील आहे 

परंतु आपण देखील जास्तीत जास्त अभ्यास करून व विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सी यु मोरे सर यांनी केले व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सोनवणे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर व माध्यमिक विद्यालयास बक्षीस देणाऱ्या दात्या आबासो एस पी बोरसे यांच्या मातोश्री मंडाबाई पिरण बोरसे यांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध