Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

शिरपुर शहर पो.स्टे.जि.धुळे हद्दीतील ०२ इसमांना केले हद्दपार...



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपुर शहर पो.स्टे. हद्दीत राहणारा इसम नामे-१) कृणाल ऊर्फ आप्पा नंदकुमार पाटील वय २६ रा. पाटीलवाडा शिरपुर जि. धुळे व २) मोन ऊर्फ जय शरद पाटील वय २६ रा. पाटीलवाडा शिरपुर जि.धुळे यांचेविरूध्द शिरपूर शहर पो.स्टे.ला यापूर्वी विविध कलमान्वये गुन्हे दाखल असुन ते वारंवार गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांचेपासुन शिरपुर शहर पो.स्टे.हद्दीतील जनतेस धोका निर्माण झाल्याने तसेच ते सार्वजनिक शांततेस वाधा निर्माण होईल असे ते वारंवार कृत्य करीत असल्याने त्यांचे वर्तनात सुधारणा दिसुन येत नसुन त्यांचे गुन्हे करण्याचे प्रवृत्तीत वाढ होत आहे.

त्यामुळे वरील इसमांना धुळे, जळगांव व नंदुरबार अशा ०३ जिल्यांमधुन हद्दपार करणेकामी त्यांचे विरुध्द मा.उप विभागीय अधिकारी, शिरपूर भाग शिरपूर जि.धुळे यांचेकडे हद्दपार प्रस्ताव सादर केला असता त्यांनी वरनमुद इसमांना धुळे, नंदुरबार व जळगांव अशा ०३ जिल्हयांमुधन ०१ वर्षांचे कालावधी करीता हद्दपार केले असुन सदर हद्दपार इसमांविरुध्द पारीत झालेल्या हद्दपार आदेशानुसार त्यांना सेंधवा शहर पो.स्टे. सेंधवा जि. वडवाणी राज्य-मध्यप्रदेश हद्दीत शोध पथकाचे अंमलदार यांचेकरवी सोडण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.के. के. पाटील व पो.स्टे. चार्ज मधील पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पवार, पोलीस उप निरीक्षक सुरेश सोनवणे, छाया पाटील, गणेश कुटे, संदिप दरवडे व रोशन निकम तसेच डी.यी. पथकाचे पोहेकों/ललित पाटील, पोकों/विनोद अखडमल, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, सचिन वाघ, आरीफ तडवी, भट्ट साळुंके, मनोज महाजन व मनोज दाभाडे अशांनी मिळुन केली आहे.

सदर इसम हे शिरपुर शहर पो.स्टे. हद्दीत राहणारे नागरिकांना दिसुन आल्यास त्यांनी तात्काळ शिरपुर शहर पो.स्टे.ला संपर्क साधावा असे शिरपुर शहरातील जनतेस जाहीर आवाहन करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध