Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई...! जुगाराचे मुद्देमालासह जुगार खेळणारे १० आरोपी ताब्यात...!



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारवाईत
जुगाराचे मुद्देमालासह जुगार खेळणारे १० आरोपी ताब्यात घेऊन एकुण ४,०८,०००/- रूपये किमतीचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.१५/०२/२०२४ रोजी ०१.३० वाजेचे सुमारास शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, वरूळ ता. शिरपूर जि. धुळे गावाचे पुढे अंतुर्ली गावाकडे जाणा-या रस्त्यावर गावठाण जागेत इसम नामे-प्रविण हिम्मत पाटील हा लोकांसह पत्त्यांचे कॅटवर रमी नावाचा हारजीतचा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असलेबाबत बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून बातमीची खात्री करून छापा कारवाई करणे बाबत आदेशीत केले.

त्याप्रमाणे शोध पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील यांनी दोन पंच व शोध पथकाचे पोलीस अंमलदार अशांसह बातमीतील नमुद ठिकाणी जावुन बातमीची खात्री केली असता वरूळ ता. शिरपूर वरूळ  गावाचे पुढे अंतुर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावठाण जागेत काही इसम जमीनीवर गोलाकार रिंगण करून बसुन मोबाईल टॉर्चचे उजेडात पत्त्यांचे कॅटवर रमी नावाचा हारजीतचा जुगाराचा खेळ खेळतांना दिसल्याने त्यांचेवर पंचांसमक्ष ०२.३० वाजेचे सुमारास छापा टाकुन जुगार खेळणारे आरोपी नामे-१) प्रविण हिम्मत पाटील वय-४४ रा. भटाणे ता. शिरपूर जि.धुळे, २) भगवान शांतीलाल सोनवणे वय ४२ रा. वरप्रमाणे, ३) सतीष दिलीप पाटील वय ३६ रा. वरप्रमाणे, ४) प्रदिप नथ्थू पवार वय ३६ रा. त-हाडी ता. शिरपूर जि.धुळे. ५) प्रेमराज रामदास शिरसाठ वय ३९ रा. नवे अंतुर्ली ता. शिरपूर जि. धुळे, ६) गणेश बन्सीलाल पारधी वय ४० रा. तन्हाडी ता. शिरपूर जि.धुळे, ७) नितीन नारायण परदेशी वय ३१ रा. वरप्रमाणे, ८) बाळु साहेबराव कोळी वय ३६ रा. नवे अंतुर्ली ता. शिरपूर जि.धुळे, ९) आनंदा गजमल पाटोळे वय ३९ रा. भटाणे ता. शिरपूर जि. धुळे यांना ताब्यात घेतले असुन पळुन गेलेल्या इसमांपैकी एका इसमाचे नाव १०) गणेश ईशी रा. अंतुर्ली ता. शिरपूर जि. धुळे असे असल्याचे समजले आहे.

वरील जुगार खेळणारे इसमांचे अंगझडतीत १४,०००/-रोख रूपये, ५४,०००/-रूपये किंमतीचे ०९ मोबाईल व ३,४०,०००/- रूपये किंमतीच्या विविध कंपनीच्या एकूण ८ मो.सा. असा एकुण ४,०८,०००/- रूपये किमतीचा जुगाराचा मुद्देमाल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली असुन त्याबाबत पोकों/मनोज राजेंद्र महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोहेकॉ ललीत पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील तसेच डी.बो. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, राजेंद्र रोकडे, पोकों/योगेश दाभाडे, विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटु साळुंके, आरीफ तडवी, सुशिलकुमार गांगुर्ड, सचिन वाघ, सतिष भामरे व होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध