Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम व अभिवादन...! ५०० महिलांचा साडी व ग्रंथ भेट देवून सन्मान...!



शिरपूर प्रतिनिधी : रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील बौद्धवाडा येथे ५०० महिलांना साडी आणि रमाई हा जीवन चरित्र ग्रंथ भेट देवून माजी नगरसेवक गणेश सावळे यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष
भूपेशभाई पटेल, निशांत रंधे (सचिव कि.वि.प्र. संस्था शिरपूर), के. डी. पाटील (सभापती कृ.उ.बा.स.), माजी नगरसेवक पिंटू शिरसाट, महिला कल्याण व बालविकास अधिकारी वैशाली निकम, प्राचार्या सारिका रंधे, केशव सावळे, प्रा.राजू पवार, बाबू खैरनार, दत्ता थोरात, उजनबाई सावळे, सुरेश अहिरे, अॅड. शालिनी सोनवणे उपस्थित होते. मान्यवरांनी रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी निशांत रंधे होते. माजी नगरसेवक गणेश सावळे यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. सावित्रीबाई रंधे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सारिका रंधे यांनी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले. महिला कल्याण व बालविकास अधिकारी वैशाली निकम यांनी विद्यार्थिनींसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली सूत्रसंचालन सुनील बैसाणे यांनी केले. 

याप्रसंगी आनंदा खैरनार, रोहिदास थोरात, रमेश कढरे, अशोक ढिवरे, रमेश वानखेडे, कल्पना खैरनार, कपिल मोरे, अॅड. योगेश शिरसाट, बापूसाहेब इंदासे, बन्सीलाल शिरसाट, भटू थोरात, ज्वाला मोरे, प्रा. अरुण पवार, प्रा मंजुळा पवार, प्रा. मुकेश सैंदाणे, सोनाली पवार, प्राचार्य डॉ. सरोजबाला महिरे, प्रा. रंजना बैसाणे, अनिल महिरराव, पनीराज बैसाणे, अनिल आखाडे, विक्की ढिवरे, दिनेश सावळे, प्रताप देवरे, विश्वास शिरसाट, शौकीन कुवर, जाकीर बागवान, सतीश खैरनार, खंडू महिरे, गौतम खैरनार, अविनाश बैसाणे, आकाश देवरे, दीपक अहिरे, विक्की आखाडे, अविनाश कुवर, जितेंद्र पवार, मंगल शिरसाट, अॅड. कामिनी वाघ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध