Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने ना. नितीन गडकरी यांनी केंद्र शासनातर्फे सावळदे ते शिरपूर रस्त्यासाठी 25 कोटी रुपयांचा भरघोस निधी केला मंजूर...



शिरपूर प्रतिनिधी : माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केंद्र शासनातर्फे रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली च्या वतीने शिरपूर तालुक्यात सावळदे ते शिरपूर रस्त्यासाठी 25 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल हे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (सी. आर. आय. एफ.) मधून शिरपूर तालुक्यात सावळदे ते शिरपूर रस्त्यासाठी 25 कोटी रुपयांचा भरघोस निधी 12 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर करण्यात आला आहे.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांनी पत्रव्यवहार करून केलेल्या मागणीनुसार सावळदे (एन. एच.-52) ते शिरपूर एम डी आर - 7 किमी 0/00 ते 2/500 ता. शिरपूर, जिल्हा-धुळे पर्यंत 2.5 कि. मी. लांबीच्या काँक्रीट रस्त्याचे काम करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.

यापूर्वी सावळदे ते शिरपूर मधील 3.50 किलोमीटर रस्त्यासाठी 25 कोटी रुपये व अर्थसंकल्प मधून 10 कोटी रुपये यापूर्वीच मंजूर झाले आहेत. आता सावळदे ते शनि मंदिर शिरपूर पर्यंत 6.2 कि.मी. चा हा एकूण 60 कोटी रुपये खर्चाचा संपूर्ण रस्ता तयार करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल हे सातत्याने पाठपुरावा करत होते. या नुसार सदर रस्त्याचे चित्र बदलणार असून नागरिकांनी आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांचे मनापासून आभार मानले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध