Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

गंगामाई औषनिर्माणशास्त्र महाविद्यालयात दि 19 ते 23 फेब्रुवारी पर्यंंत अद्वितीय 2के24 वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न...!



धुळे प्रतिनिधी:-दि.19 रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली व व्याख्यानाचे आयोजन करुन या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा.श्री.बाळासाहेब मनोहरजी भदाणे, उपाध्यक्षा माईसौ. ज्ञानज्योती भदाणे, गंगामाई वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, वक्ते प्रा. सतीष अहिरे, गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभवकुमार जगताप,तसेच उपप्राचार्य ,सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. 

या वेळी बॉलीवूड डे, ट्रॅडिशनल डे चे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूड डे मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव परिधान करत मनोरंजन केले.  ट्रॅडिशनल डे व मिस मॅच डे यामध्ये विद्यार्थ्यांनी मंचावर सादरीकरण केले. अंताक्षरी चा कार्यक्रम राबविण्यात आला. वार्षिक संमेलनामध्ये मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, फॅशन शो, नृत्य स्पर्धांसह क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, कबड्डी, व्हॉलीबॉल यासारख्या विविध खेळ स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच दिनांक 23 फेब्रुवारी रोजी अद्वितीय 2K24 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले, या स्नेहसंमेलनामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्पूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये विविध कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या. वार्षिक स्नेहसंमेलन बक्षिस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.रविंद्रजी निकम(अध्यक्ष, ओंकार बहुउद्देशीय संस्था, गोंदुर), मा. श्री.विजयची चौधरी (तालुकाध्यक्ष केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियशन धुळे), संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब राघवेंद्रजी भदाणे, गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वैभवकुमार जगताप,तसेच उपप्राचार्य ,सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध