Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

पिंपळादेवी विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा....!



धुळे प्रतिनिधी- धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील मनापा शाळा क्रमांक ५५, ५६, श्री पिंपळादेवी बालमंदिर, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७५ वा प्रजासत्ताक दिन संस्थाध्यक्ष विनायक बापूजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे दिनविशेष मुख्याध्यापक आर.व्ही.पाटील यांनी सांगितले. ध्वजारोहण संस्थेचे संचालक शिवाजी रामदास शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

तर न्यू पिंपळादेवी प्राथमिक शाळेत आवाज सम्राट चे संपादक कैलास भाऊ गर्दे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सुरुवातीला परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. स्काऊट, गाईड व एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी यावेळी घुंगरू काठी, डंबेल्स, झेंडा कवायत, झांज व लेझीम पथक, लाठीकाठी, तलवारबाजी, मल्लखांब आदी प्रात्यक्षिके दाखवली. त्यानंतर व्यसनमुक्ती ची सामुहिक शपथ देण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ यात सचिव अशोक तोटे, डॉ. राहुल शिंदे, डॉ. भानुदास शिंदे, डॉ. प्रशांत साळुंखे, कैलास गर्दे, कुणाल पवार, डॉ. शैलेंद्र सूर्यवंशी, आकाश शिंदे, नितीन गावडे, राजेंद्र दहातोंडे, आबा पानगे, एस. बी. पाटील, एस. डी. बाविस्कर, छगन पठाण, चंद्रकांत शिंदे, एकनाथ देवरे, रामदास कोकणे , प्रशांत शिंदे, संदीप देवरे, नितीन पाटील, प्रताप शिंदे, संजय पाटील, चंदू पारखे, एस. पी. पाटील, विलास निकम, एस. एम. पाटील, के. एस. वाघमारे, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मनापा शाळा क्र. ५६ च्या मुख्याध्यापिका श्रीमती भोसले, प्राथमिकचे मुख्याध्यापक व्ही. बी. ठाकरे, पर्यवेक्षक एस. एस. पाटील, सर्व शाखांचे शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार उपमुख्याध्यापक के. आर. सावंत यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध