Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

शिरपूर तालुका पोलिसांनी पर राज्यातून महाराष्ट्रात होणारी गुटखा तस्करी रोखली



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्रीराम पवार  यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली असून मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कारवाई करत परराज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असलेल्या वाहनावर कारवाई करत 23 लाखांच्या मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

दि. 30/01/2024 रोजी पोलीस निरिक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली को, सेंधवा कडुन शिरपुर कडे एक ट्रक क्र. DI, 01 GC 5154 या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू भरुन महाराष्ट्र राज्यात पुरवठा करण्यासाठी वाहतुक करीत आहे. 

पोनि/श्रीराम पवार यांनी लागलीच एक पथक तयार करून सदर वाहनाची खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेशित करुन सदर वाहन हे हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे दि. 30/01/2024 रोजी सकाळी 06.30 वाजेच्या सुमारास पकडून वाहनावरील चालक व क्लिनर यांचं नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव चालक 1) सहाम मुनीजर वय 32 वर्षे, व्यवसाय चालक, क्लीनर 2) मो. विलाल फजरखान, वय 27 वर्षे, दोन्ही रा. फिरोजपुर मेयो ता. पुनहाना जि. नुह राज्य हरियाणा असे सांगुन त्यास वाहनात काय आहे बाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे सदर वाहनात तंबाखू सदृश पदार्थ असल्याचा संशय असल्याने सदर वाहन पोलीस ठाण्यात आणून दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन त्यात खालील प्रमाणे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू मिळुन आली त्यात  4,70.400/- रुपये किंमतीची अराधना छाप नावाची सुगंधित तंबाखू,3,96,800/- रुपये किमतीची प्रिमीयम रत्ना छाप नावाची सुगंधित तंबाखू,  15,00,000/- किंमतीचा एक 10 चाकी अशोक लेलैंड कंपनीचा ट्रकत्याचा R.T.O. पासिंग क्रमांक DL 01 GC 5154 एकुण- 23,67,200/-  असा मुद्देमाल व वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक  किशोर काळे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर सचिन हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्रीराम पवार, असई/रफिक मुल्ला, पोहवा संदिप ठाकरे, चालक पोहवा संतोष पाटील, पोशि/योगेश मोरे, पोशि/स्वप्नील बांगर, पोशि संजय भोई, पोशि /कृष्णा पावरा यांनी केलेली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध