Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या सिंचन विहिरींचे अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा:-अ.भा.भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे माननीय आ.सौ.मंजुळाताई गावित यांना निवेदन सादर



अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर यांच्या आदेशाने नुकतेच साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष व लाडक्या आमदार माननीय सौ.मंजुळाताई तुळशीरामजी गावित यांना साक्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणे बाबत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात असे नमूद केले आहे की, साक्री तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती साक्री यांच्या कार्यालयाकडून शेकडो विहिरी मंजूर करण्यात आलेले आहेत. सदर विहिरींचे लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर झालेल्या असून त्या विहिरींचे वर्क ऑर्डर, लेआउट हे देखील मंजूर झालेले होते त्या अनुषंगाने अभियंत्यांमार्फत ले आऊट टाकून शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या नातेवाईकांकडून तसेच इकडून तिकडून व्याजाचे पैसे उचलून सदर विहिरींचे काम केलेले आहेत. परंतु साक्री पंचायत समिती कार्यालयाकडून मस्टर टाकतेवेळी शेतकरी बांधवांना असे कळविले जात आहे की, सध्या तरी अनुदान उपलब्ध नाही असे उडवा उडवी चे उत्तर देऊन शेतकरी बांधवांना नाहक त्रासात टाकले जात आहे.
याबाबत माननीय आमदार सौ मंजुळाताई तुळशीरामजी गावित यांना विनंती करण्यात येते की, आपण आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून पंचायत समिती साखरी यांना सदर रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरींची अनुदान तात्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करावे असे आदेशित करावे अन्यथा अनुदाना अभावी शेतकरी बांधवांनी आत्महत्या किंवा त्यांच्या जीवाचे काही एक बरे वाईट झाल्यास या सर्व घटनेस प्रशासन जबाबदार राहील असे नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष निवड समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल दादा देसले, महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्ष (महिला विभाग) प्राजक्ताताई देसले, प्रदेश सेक्रेटरी श्री.प्रवीण दादा बोरसे, जिल्हाध्यक्ष (परिवहन विभाग) करूनाताई पाटील, जिल्हा अध्यक्ष आदिवासी सेल (शहरी विभाग) श्री.रविंद्र ठाकरे, जिल्हा अध्यक्ष (आध्यात्मिक आघाडी) श्री.जितेंद्र बच्छाव,धुळे जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण विभाग) व उपसरपंच छडवेल.प.श्री.सचिन दादा पाटील, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.संजय कालेश्वर बच्छाव, धुळे जिल्हा संघटक श्री.कृषीकांत सोनवणे, जिल्हा अध्यक्ष आदिवासी सेल ( ग्रामीण विभाग) श्री.डोंगरू बहिरम, साक्री तालुका अध्यक्ष श्री.नितीन दादा ठाकरे, साक्री तालुका उपाध्यक्ष श्री.राहुल भामरे, साक्री तालुका अध्यक्ष (व्यापारी असोसिएशन)श्री.विनोद कुमार पगारिया, साक्री तालुका अध्यक्ष (माळा माता परिसर)श्री.दत्तात्रेय पवार, साक्री तालुका संघटक श्री. दीपक भामरे, साक्री तालुका सहसंघटक श्री.प्रमोद बोरसे उपाध्यक्ष (माळमाथा परिसर) श्री.दीपक ठाकरे, संघटक (माळमाथा परिसर) श्री.आत्माराम देवरे यांनी स्वाक्षरी केलेले आहेत.माननीय आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्याशी निवड समितीचे प्रदेश अध्यक्ष श्री.अनिल दादा देसले, प्रदेश अध्यक्ष महिला विभाग प्राजक्ता ताई देसले,नवडणे गावाचे प्रगतशील शेतकरी बाबासो अशोक महारु ठाकरे,खान्देश गांधी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.विकास देसले,धुळे जिल्हा अध्यक्ष श्री.सचिन दादा पाटील,साक्री तालुका अध्यक्ष श्री.नितीन दादा ठाकरे, साक्री तालुका उपाध्यक्ष श्री.राहुल भामरे, साक्री तालुका सहसंघटक श्री.प्रमोद दादा बोरसे, शेणपुर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.भाऊसाहेब वाघ यांनी याविषयी बऱ्याच वेळ चर्चा केली चर्चेअंती माननीय आमदार सौ.मंजुळाताई गावित यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर अनुदान वर्ग करण्याबाबतचे आश्वासित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध