Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

महावितरण कंपनीच्या निष्काळजी अधिकाऱ्यांमुळे गणपुर परिसरातील विद्यार्थी शेतकरी व वाहन चालकाचा जीवाला धोका...



गलंगी प्रतिनिधी :- चोपडा तालुक्यातील अनेर पासून जवळच असलेले गणपुर तालुका चोपडा येथे विद्युत वाहिनीच्या तारा अक्षरशः हाताला टच होतील एवढ्या लोंबकल्या असून जीर्ण सुद्धा झालेल्या दिसून येत आहेत गणपुर ते गलंगी मेन वाहतुकीच्या रस्ता असल्याने व रस्ता लगतच्या बाजूलाच पाचवी ते दहावीपर्यंत विकास माध्यमिक विद्यालय असून व गलंगी पर्यंतच्या एकमेव रहधारीचा रस्ता असून वाहनांची रात्रंदिवस रात्र दिवस वाहनांचे येणे जाणे सुरूच असल्यामुळे एखाद्या वेळेस वाहन ओव्हरटेक किंवा साईड दिल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही व शाळेच्या विद्यार्थ्यांची तर नेहमीच शाळेत जाण्याची वर्दळ सुरूच असल्यामुळे शाळेचे विद्यार्थ्यांची येताना व जाताना सायकलीने किंवा आपापल्या मस्तीमध्ये चालत असतात त्यात कोणत्या विद्यार्थ्यांच्या हात लागेल हे सुद्धा सांगणे कठीणच महावितरणाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने तारा बदलून ताण देऊन वरती कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे लोंबकणाऱ्या तारांविषयी कार्यालयात ग्रामस्थांनी व शिक्षक वर्ग यांनी वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात कळवून देखील या महावितरण कंपनीच्या निष्काळजी अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्यामुळे लोबकणाऱ्या तारांमुळे वाहनाला व विद्यार्थ्यांना रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. भविष्यात दुर्दैवाने या लोंबकळणार्‍या विद्युत तारांमुळे एखाद्याची जीवित हानी झाल्यास त्याची जबाबदारी ही महावितरणाची असेल याची जाणीव या अधिकाऱ्यांनी तात्काळ घेऊन वेळीच उपाययोजना करावी असे परिसरातील नागरिकांकडून वर्तविले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध