Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

अरणगाव जि.प शाळेत, बाल आनंद मेळावा उत्सहात संपन्न...

परंडा (राहूल शिंदे )दि.१३रोजी तालुक्यातील आरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.
आनंद मेळाव्यात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.

मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच युसूफ पठाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी तौर, जवळा केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम.अंकुलवार, केंद्रीय मुख्याध्यापक कोल्हे, अनिल पिंगळे, ग्रा. प सदस्य प्रमोद तौर इ.मान्यवरांनी केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक नागनाथ देशमुख व शिक्षक वृंदांनी केले.

या बाल आंनद मेळाव्यासाठी धनंजय कारकर,नितीन गायकवाड, यशवंत कानगुडे, धनंजय ढगे, उपरे आदी.बहुसंख्य शिक्षकांनी उवस्थितीत राहून विध्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.प्रमोद तौर,रामहरी पिंगळे, धनंजय आदलिंगे, बाळासाहेब कसपटे, अंकुश पाटील,लहू गवळी, दादा पठाण,धनाजी तौर, तात्या पिंगळे,वसंत कांबळे, सरफराज पठाण,शरद पिंगळे, मोहन कासपटे, तात्या कुलकर्णी, तात्यासाहेब पिंगळे, कृष्णा पिंगळे, बशीर पठाण,हुसेन पठाण आदि बहुसंख्य पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. - नागनाथ देशमुख, मुख्याध्यापक
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंद श्रीम. लैला मुलानी, श्रीम. सुवर्णा खटाळ, श्रीम. माधुरी शिंदे,श्रीम. माधुरी पवार मोहन कापुरे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध