Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ जानेवारी, २०२४

दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साक्रीत पत्रकारांच्या वतीने प्रतिमा पूजन..



आज मराठी पत्रकार दिन वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पाक्षिक सुरू करून मराठी वृत्तपत्राचा पाया रोवला.त्यांच्या या महान कार्याचे आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.याच अनुषंगाने आज साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साक्री येथील क्लासिक फोटो स्टुडिओ येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून साक्रीचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रसाद रौंदळ,तुषार जाधव,प्रेस क्लबचे संस्थापक आबासाहेब सोनवणे, दै. सकाळचे साक्री तालुका प्रतिनिधी जगदीश शिंदे सर,जन ग्रामीण पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सल्लागार जी टी मोहिते,धुळे जिल्हा संघटक तसेच लोकमतचे साक्री तालुका प्रतिनिधी विद्यानंद पाटील सर,पत्रकार राजेंद्र वाघ, डॉ.प्रा.कैलास वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन जन ग्रामीण पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाघ,उपाध्यक्ष अखिल शहा,शहराध्यक्ष जितेंद्र जगदाळे, उपाध्यक्ष संघपाल मोरे,पत्रकार हरीश मंडलिक,पत्रकार चंद्रशेखर
अहिराव तुषार ढोले आदींनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध