Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी ने विविध ठिकाणी अभ्यास दौऱ्यांचे केले आयोजन...



नगांव येथील गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातर्फे प्रथम वर्ष डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांकरीता एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले, पीसीआय नवी दिल्ली येथील नवीन अभ्यासक्रमानुसार हा अभ्यास दौरा नुकताच झाला 
यात महाविद्यालयाने प्रथमत: लळींग येथील आयुर्वेदिक वनऔषधी गार्डनची पाहणी केली त्यानंतर अष्टांग आयुर्वेदिक फार्मसी अवधान, तिखी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प येथे भेट दिली तसेच विद्यार्थ्यांनी श्री गणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल धुळे येथेही भेट दिली तेथील रुग्णांसोबत चर्चा केली
    

अभ्यास दौऱ्याच्या आयोजनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वैभवकुमार जगताप व HOD डॉ.विनोद वाघ यांचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयाचे प्रा.गोडम पाटील प्रा. कुणाल पाटील प्रा.कल्याणी महाजन प्रा. कविता पाठक प्रा.मयुरी सोनवणे प्रा.करीना पिंजारी प्रा.निलिमा पवार प्रा.ऋषिकेश गारकर यांच्या उपस्थितीत हा अभ्यास दौरा पार पडला, तसेच संस्थेचे सचिव मा. मनोहर भदाणे,उपाध्यक्ष मा.ज्ञानज्योती भदाणे अध्यक्ष मा.राघवेंद्र भदाणे यांनी अभ्यास दौऱ्याचे कौतुक केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध