परंडा(राहूल शिंदे)दि.६ येथील सरगम मंगल कार्यालयात व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या परंडा शाखेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर , माजी आमदार राहुल मोटे. माजी सभापती दत्ता साळुंके, रणजीत पाटील शिवसेना (जिल्हाप्रमुख ठाकरे गट), पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,पांडुरंग माढेकर नायब तहसीलदार,माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल ,मुकुल देशमुख, रमेश परदेशी,आर पी आय संजय बनसोडे, राहुल बनसोडे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष , सरगम उद्योगस समूहाचे अध्यक्ष बाशाभाई शहाबर्फीवाले,अँड नुरोद्दीन चौधरी आदी मान्यवराची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारीता केल्यास राज्यकर्त्यांना झुकविण्याची व समाज घडवविण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे. राजकारणात येण्या अगोदर दहा वर्ष मी पत्रकारीताच केली व राजकारणातून निवर्ती नंतर देखील पत्रकारिताच करण्याची इच्छा आहे. -मा.आमदार सुजितसिहं ठाकुर
सोशल मीडिया काळात देखील वृत्तपत्रावर वाचकांचा विश्वास आजही कायम असल्याचे सांगीतले.तसेच हातून चांगले काम झाले तर शाबसकी देतात व चुकीचे झाले तर चूक निदर्शनास आणून देतात.आपल्या कामाचा आरसा नेहमी आपल्याला दाखवत असतात. - पो.निरीक्षक विनोद इज्जपवार
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराकडे पाहिले जाते समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीतून करीत आहेत. या चौथ्या स्तंभामुळेच देशातील लोकशाही आभाधित आहे. नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर
याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे जगन्नाथ साळुंखे , अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे भारत घोगरे , क्रीडा क्षेत्रात कार्य करणारे शिवाजीराव कदम, आदर्श शेतकरी पालक बबन नवले , दिव्यांग भूषण पुरस्कार तानाजी घोडके तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणारे डॉ.देवदत्त कुलकर्णी, डॉ.आनंद मोरे, डॉ.सचिन मोरे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आला . शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल मुख्याधापक किरण गरड (कल्याणसागर माध्यमिक विद्यालय) ,मु.अ रणजीत घाडगे(महात्मा गांधी विद्यालय) ,मु.अ सुभाष जगताप (कै.रावसाहेब पाटील विद्यालय), बिभीषण रोडगे (संस्थापक अध्यक्ष बावची विद्यालय), मु.अ सत्यजित घाडगे (जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर), मु.अ अंकुशराव जाधव (जि.प कन्या उच्च प्राथमिक शाळा) आदींचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बळीराम गंगणे यांनी करून उपस्थितांची मने जिंकली.तर स्वागत गीत कल्याणसागर विद्यालयाच्या मुलींनी सादर केले. कार्यक्रमांसाठी तालुकाध्यक्ष प्रमोद वेदपाठक, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, मराठवाडा उपाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष मुजीब काझी, सचिव तानाजी घोडके, उपाध्यक्ष आलीम शेख , सहसचिव रवींद्र तांबे , सदस्य संतोष शिंदे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम विद्वत, बाबर मशायक , दत्ता नरुटे , नाना केसकर , विजय मेहर , साजिद शेख , राहुल शिंदे , फारूक शेख , धनंजय गोफणे रतिलाल शहा , शंकर घोगरे , उत्तरेश्वर शिंदे , रावसाहेब काळे , शिवाजी सूर्यवंशी , समीर ओव्हाळ इ.पत्रकार बांधव व विविध पक्षाचे राजकीय नेते मंडळी,व्यापारी,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा