Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाजपा आयुष्यमान भारत (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी राजुलाल मारवाडी यांची केली नियुक्ती...



शिरपूर प्रतिनिधी : भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाजपा आयुष्यमान भारत (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी राजुलाल नथ्थुलाल मारवाडी रा. शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे यांची नियुक्ती केली आहे. धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दि. २६ जानेवारी रोजी भाजपा आयुष्यमान भारत (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी राजुलाल मारवाडी यांना भाजपा कार्यालय शिरपूर येथे नियुक्ती पत्र दिले. नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, धुळे ग्रामिण भारतीय जनता पार्टीच्या आयुष्यमान भारत (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी मी आपली नियुक्ती करीत आहे. आपण सामाजिक, राजकीय, पत्रकारीता व विविध क्षेत्रात काम करीत आहात. त्याची दखल घेवून आपली ही नियुक्ती करण्यात येत आहे. 

आपल्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा उपयोग पक्षवाढीसाठी निश्चितपणे होईल. आपण ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. असे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी म्हटले आहे. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, प्रशांत राजपुत, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, शिरपूर मर्चंट बॅन्क व्हा चेअरमन रामदास पुरी, शहराध्यक्ष प्रकाश गुरव, बाराबलुतेदार महासंघ शहराध्यक्ष  रमेश चौधरी, अल्पसंख्यक मोर्चा शहराध्यक्ष रफीक तेली, भाजपा जिल्हा सदस्य योगीराज बोरसे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनार, जेन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष गणेश जैन, पत्रकार राजु भावसार, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र गिरासे, तालुकाध्यक्ष अर्जुन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नितीन गिरासे, राजस्थान प्रकोष्ठ तालुका संयोजक भुपेश अग्रवाल, कुळखळी माजी सरपंच अवधुत मोरे आदि उपस्थित होते. 

धुळे ग्रामिण भारतीय जनता पार्टीच्या आयुष्यमान भारत (सेल) आघाडी जिल्हाध्यक्षपदी राजुलाल मारवाडी यांची नियुक्ती झाल्याबद्दल आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावित, माजीमंत्री आ. जयकुमार रावळ, माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल, माजीमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. हिनाताई गावीत, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र विभाग संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, आ. काशिराम पावरा, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा प्रभारी स्मिताताई वाघ, शिरपूर प्रियदर्शनी सुतगिरणी चेअरमन भुपेशभाई पटेल आदिंनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध