Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

धुळे येथे शिवसेना (उबाठा) चा जनता दरबार कार्यक्रम संपन्न...! शिरपूर तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन...!



शिरपूर प्रतिनिधी -  महाराष्ट्र राज्यात विद्यमान सरकारकडून शासन आपल्या दारी ही फसवी योजना राबवली जात असून त्यावर शासन करोडोच्या खर्च करून देखील जनतेचे प्रश्न मात्र मार्गी लागत नाहीत. मात्र यात शासकीय यंत्रणेच्या दुरुपयोग करून राजकीय सभा घेतल्या जातात असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी धुळे येथे केला आहे.

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावण्यासाठी आता शिवसेनेकडून जनता दरबार हा अत्यंत महत्त्वकांक्षी उपक्रम शिवसेनेकडून राबविला जात असून आज आज दिनांक 29 जानेवारी रोजी धुळे येथे जनता दरबार चे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हाभरातील नागरिकांच्या विविध प्रश्न व समस्या यावर चर्चा होऊन ते सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी व विविध शासकीय अधिकारी व नागरिक यावेळेस उपस्थित होते.

सदर जनता दरबारात शिरपूर तालुक्याकडून उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत यांनी निवेदन सादर करून तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करून ते मार्गी लावण्यासाठी विनंती केली. यात  शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधांच्या अभाव असून विविध विभागांचे डॉक्टर स्टाफ नियुक्त नाहीत. या या रुग्णालयात फिजीशियन (एम.डी.)सर्जन, ऑर्थोपेडीक,  नेत्रचिकित्सक,एम.बी.बी.एस. ३ जागा, रेडिओलॉजिस्ट इ. जागा खाली असून त्या जागांवर डॉक्टरांची लवकरात लवकर नियुक्ती होणेबाबत विनंती करण्यात आली असून याबाबत महिनाभरात डॉक्टरांचे नियुक्ती केली जाईल असे आश्वासन प्रशासनामार्फत देण्यात आले आहे.

शहरालगत करवंद येथे असलेल्या सनस्टार स्टार्च फॅक्टरी पासून येणाऱ्या जिवघेण्या दुर्गंधीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून याबाबत अनेक वेळा आंदोलन व निवेदन देऊन देखील प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत याबाबत तातडीने उपाययोजना करावी.

शहरात लागु असलेल्या नगरपरिषदेची अवाजवी घरपट्टी व पाणीपट्टी  व व्यवसायिकांवर लावण्यात आलेले उपकर कमी कमी करावे,

 बन्हाणपुर- अंकलेश्वर महामार्ग हा जिवघेणा महामार्ग झाला असून तो तात्काळ दुरुस्त करण्यात यावा,

तालुक्यात व शहरात स्वस्त धान्याचे युनिट मध्ये वाढ करण्याची गरज असून याबाबत देखील उपाययोजना करावी,

अनेर धरणातून उजवा कालव्यात सोडण्यात आलेल्या पाणी सोडण्याच्या मुदतीत वाढ होणे

शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणे बाबत प्रक्रिया सुलभ करावी.

नियमीत कर्जदार शेतकऱ्यांना रु.५०,०००/-
कर्जमाफीचा लाभ मिळावा.

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी शेतकरी सहकारी प्रकल्पशिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन माननीय विरोधी पक्षनेते अंबादास जी दानवे यांना सादर करण्यात येऊन आपल्या माध्यमातून शासन दरबारी या सर्व मागण्या त्याबाबत सकारात्मक विचार होऊन त्या पूर्ण करण्यात याव्या अशी विनंती करण्यात आली.

या सर्व मागण्यांच्या गांभीर्याने विचार करून त्या शासन दरबारी मांडून हे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन यावेळेस देण्यात आले.या वेळी उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, अत्तरसिंग पावरा, अनिकेत बोरसे,देवेंद्र पाटील,
वाजिद मालक,विजय पावरा,जितेंद्र राठोड, युवराज पाटील,शरद पाटील, चेतन जाधव,तेजस पाटील व  अपआपल्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध